मोठी बातमी! इराणने अमेरिकेचं नाक दाबताच डोनाल्ड ट्रम्प यांनी गुडघे टेकले; सर्वात मोठी घोषणा

इराण आणि अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरूच आहे, अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच असून, इराणकडून देखील अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! इराणने अमेरिकेचं नाक दाबताच डोनाल्ड ट्रम्प यांनी गुडघे टेकले; सर्वात मोठी घोषणा
donald trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 02, 2026 | 9:36 PM

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्ध चांगलंच पेटलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये काही दिवसांपूर्वी युद्धविराम झाला होता, परंतु त्यानंतर अमेरिकेकडून युद्धविराम संपल्याची घोषणा झाली आणि इराणवर हल्ला करण्यात आला, दरम्यान प्रत्युत्तर म्हणून त्यानंतर लगेचच इराणकडून मध्य पूर्वेत असलेल्या अमेरिकन सैन्य तळांवर हल्ले करण्यात आले. अमेरिकेकडून इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलं असून, या युद्धात इराणचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु इराण देखील माघार घेण्यास तयार नाहीये, इराणकडून देखील अमेरिकन सैन्य तळांवर हल्ले सुरूच आहेत. शुक्रवारी मोठी बातमी समोर आली होती, अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणच्या पावर प्लांटवर मोठा हल्ला करण्याचा प्लान तयार केला आहे. याच पार्श्वभूमीवर जसे आहात तसे पश्चिम आशियामधून बाहेर पडा, अशा सूचना अमेरिकेकडून आपल्या नागरिकांना देण्यात आल्या होत्या.

परंतु इराणच्या एका धमकीमुळे अखेर अमेरिकेनं माघार घेतली आहे, इराणकडून अमेरिकेला धमकी देण्यात आली होती, जर तुम्ही ऊर्जा प्लांटवर हल्ला केला तर हे प्रकरण फक्त अमेरिका आणि इस्त्रायल पुरतं मर्यादित राहणार नाही तर आम्ही सौदी अरब, कतार, युएई आणि संपूर्ण खाडी प्रदेशात जेवढे काही पावर प्लांट आहेत, त्या सर्वांना उडवू देऊ, असं इराणने आपल्या धमकीमध्ये म्हटलं होतं. इराणच्या या धमकीमुळे फक्त अमेरिका आणि इस्त्रायलचचं टेन्शन वाढलं नाही तर सौदी अरेबियाची देखील चिंता वाढली होती. दरम्यान त्यानंतर क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान हे थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलले आणि इराणवर हल्ला करू नये, तणाव कमी करावा असं त्यांना म्हटलं. दरम्यान त्यानंतर अमेरिकेनं इराणवर हल्ल्याचा आपला प्लान रद्द केला आहे, आम्ही इराणवर हल्ला करणार नसल्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला निर्णय का बदलला?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की अमेरिकन सैन्य पूर्णपणे हल्ल्यासाठी तयार होते. दुसऱ्या महायुद्धानंतर एवढा भीषण हल्ला इराणवर पहिल्यांदाच होणार होता. मात्र मध्य पूर्वेतील इतर देशांनी चर्चेतून हा प्रश्न सोडवावा अशी आम्हाला विनंती केली, त्यामुळे आता हा हल्ला टळला आहे. जेवढ्या लवकर करार होईल तेवढ्या लवकर स्ट्रेट ऑफ होर्मूज सर्वांसाठी पूर्ववत खुला होईल अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us