AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US, Iran conflict : असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना चांगलंच सुनावलं; म्हणाले …तर इराणसोबत चर्चाच होणार नाही

मोठी बातमी समोर येत आहे, इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना फोन केला आहे.

US, Iran conflict : असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना चांगलंच सुनावलं; म्हणाले ...तर इराणसोबत चर्चाच होणार नाही
Asim MunirImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 20, 2026 | 9:43 PM
Share

मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज ओपन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अमेरिकेनं आपण नाकेबंदी काय ठेवणार असल्याची भूमिका घेतली. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे दुसऱ्याच दिवशी इराणने पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जाहजांसाठी बंद केला आहे. याचदरम्यान भारताच्या दोन जहाजांवर फायरिंगची देखील घटना घडली होती. दरम्यान त्यानंतर अमेरिकेनं इराणचं एक व्यापारी जहाज आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी तापलं आहे. इराणकडून देखील अमेरिकेला धमकी देण्यात आली आहे, आम्ही देखील उत्तर देऊ असं इराणने म्हटलं आहे.

दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला होता. आता युद्धविराम संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केली होती. युद्धविरामाच्या वाटाघाटीची पहिली फेरी देखील पाकिस्तानमध्येच पार पडली होती, मात्र त्यामध्ये यावर कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. दरम्यान युद्धविराम संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याशी फोनवर संवाद साधला. मात्र यावेळी असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट शब्दा सुनावलं आहे. पाकिस्तानकडून अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ होर्मूजवर लावलेल्या नाकेबंदीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जोपर्यंत अमेरिकेची स्ट्रेट ऑफ होर्मूजवर नाकेबंदी कायम आहे, तोपर्यंत ही चर्चा पुढे जाऊच शकत नाही, असं असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना सांगितलं आहे, दरम्यान यावर विचार केला जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी असीम मुनीर यांना सांगितलं आहे. त्यामुळे आता अमेरिका स्ट्रेट ऑफ होर्मूजवरची आपली नाकेबंदी हटवणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा हा मार्ग बंद झाल्यामुळे अमेरिकेवरील दबाव वाढला आहे. सर्वांचं लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेकडे लागलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...