मोठी बातमी! सर्वात जवळच्या मित्राकडूनच इराणचा मोठा विश्वासघात, एकीकडे पाठिंबा तर दुसरीकडे हल्ल्यासाठी पुरवले शक्तिशाली बॉम्ब

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, इराणचा मोठा विश्वासघात झाल्याचं समोर आलं आहे. एकीकडे इराणची बाजू घेत या युद्धाला विरोध करण्यात आला, तर दुसरीकडे इराणवर हल्ल्यासाठी दारू गोळा पुरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! सर्वात जवळच्या मित्राकडूनच इराणचा मोठा विश्वासघात, एकीकडे पाठिंबा  तर दुसरीकडे हल्ल्यासाठी पुरवले शक्तिशाली बॉम्ब
America Israel Iran War
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 12, 2026 | 4:15 PM

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून जगभरातील देशांचं दोन गटात वर्गीकरण झाल्याचं दिसून येत आहे. काही देशांनी थेट या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रायला पाठिंबा दिला आहे. तर काही देशांनी इराणची बाजू घेत या युद्धाला विरोध केला आहे. चीन, रशिया सारख्या बलाढ्य देशांनी या युद्धाला विरोध करतानाच अमेरिकेला देखील सुनावलं आहे. हा प्रश्न शांततेच्या मार्गाने आणि चर्चेनं सोडवला जावा, अमेरिका आणि इस्त्रायल आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन करत आहे, अशी भूमिका या युद्धासंदर्भात रशियाने घेतली आहे. तसेच इराणने आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करताच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी थेट इराणला पाठिंबा देखील जाहीर केला आहे.

रशिया, चीन प्रमाणेच काही मुस्लिम राष्ट्रांनी देखील इराणला पाठिंबा दिला आहे, त्यामध्ये पाकिस्तान, तुर्की सारख्या देशांचा समावेश आहे. मात्र आता जी बातमी समोर आली आहे, त्या बातमीनं मध्य पूर्वेत मोठी खळबळ उडाली आहे. इराणवर हल्ला करण्यासाठी तुर्कीच्या दारू गोळ्याचा आणि बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. एकीकडे तुर्कीने अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांचा अधिकृतपणे विरोध केला आहे. आपण इराणसोबत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र दुसरीकडे आता या रिपोर्टनुसार इराणवर हल्ला करण्यासाठी तुर्कीनेच इस्त्रायला दारू गोळा आणि बॉम्ब पुरवल्याची माहिती समोर येत आहे. इस्त्रायलने इराणविरोधात हल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणात तुर्कीचा दारू गोळा वापरल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत या युद्धात इराणच्या 2 हजारांपेक्षा जास्त सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

काय सांगतो रिपोर्ट?

मीडल इस्ट आयच्या एका रिपोर्टनुसार इराण आणि इराणची राजधानी तेहरानवर युद्धादरम्यान हल्ला करण्यासाठी इस्त्रायलकडून बीएलयू-110ए/बी या बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. या बॉम्बची निर्मिती तुर्कीमधील एक कंपनी करते. हे वृत्त समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे, मात्र यावर अद्याप तुर्कीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us