Chirag Paswan: चिराग पासवान माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्येशी करणार विवाह? चर्चांवर अखेर सोडलं मौन, सांगितलं त्या फोटोमागचं सत्य

Chirag Paswan: माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आरुषी निशंक हिने चिराग पासवान यांच्यासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर अखेर प्रतिक्रिया दिली आहे. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना उधाण आलं.

Chirag Paswan: चिराग पासवान माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्येशी करणार विवाह? चर्चांवर अखेर सोडलं मौन, सांगितलं त्या फोटोमागचं सत्य
आरुषी निशांक आणि चिराग पासवान
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2026 | 8:45 AM

अभिनेत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरूषी निशंक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्यासोबत तिचं नाव गेल्या काही काळापासून जोडलं जात आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चांनीही सोशल मीडियावर जोर धरला होता. विशेष म्हणजे दोघांचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आलं. आता आरुषीने स्वत: या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं असून व्हायरल फोटोंमागचं सत्य सांगितलं आहे. यावेळी तिने ‘मी तर ट्रोल मटेरियल आहे’ असं म्हणत मिश्किल प्रतिक्रिया दिली.

चिराग पासवान यांच्यासोबतच्या लग्नाच्या चर्चा

आरुषी निशंकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चिराग पासवान यांच्यासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं. ‘IANS’सोबत बोलताना तिने या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. चिराग पासवान हे आपले खूप चांगले मित्र असल्याचंही तिने सांगितलं. आरुषी म्हणाली, “मी तर ट्रोल मटेरियल आहे. मला कधीही ट्रोल केलं जाऊ शकतं. पण गंमत बाजूला ठेवली तर चिराग माझे खूप चांगले मित्र आहेत आणि ते खूप चांगलं काम करत आहेत. मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि एक पुस्तक भेट देण्यासाठी गेले होते. मात्र, लोकांनी त्या पुस्तकाला लग्नाचं आमंत्रण समजलं.” सार्वजनिक जीवनात वावरत असताना अशा गैरसमजांना सामोरं जावं लागतं, असंही तिने सांगितलं. लोक आपल्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे कधीकधी अशी एखादी गैरसमजूत झाली तर त्यात काही हरकत नाही, असं आरुषीने म्हटलं.

Loading...

पहा फोटो-

एका पुस्तकामुळे सुरू झाल्या लग्नाच्या चर्चा

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 2024 मध्ये झाली होती. त्यावेळी आरुषीने चिराग पासवान यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. फोटोंमध्ये आरुषीच्या हातात एक पुस्तक दिसत होतं. मात्र, नेटकऱ्यांनी या पुस्तकाचा संबंध थेट लग्नाच्या निमंत्रणाशी जोडला. त्यानंतर दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता आरुषीने या चर्चांना पूर्णविराम देत ती केवळ मैत्रीपूर्ण भेट असल्याचं स्पष्ट केलं आहे.

धीरेंद्र शास्त्रींसोबतच्या फोटोवरही झाली होती ट्रोल

या मुलाखतीमध्ये आरुषीने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दलही भाष्य केलं. सप्टेंबरमध्ये तिने बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र, त्यावरही अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. याबद्दल बोलताना आरुषी म्हणाली की, धीरेंद्र शास्त्री हे तिचे महाराजजी आहेत. ते संत व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल अशा प्रकारच्या कमेंट वाचून मला वाईट वाटलं.

दरम्यान, आरुषी निशंक ही अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती, कथ्थक नृत्यांगना आणि TEDx स्पीकरदेखील आहे. जुबिन नौटियालच्या ‘वफा ना रास आई’ या गाण्यातून तिला विशेष ओळख मिळाली. ‘लाइफ हिल गई’ आणि ‘मेजर निराला’ यांसारख्या प्रोजेक्ट्सच्या निर्मितीशीही ती जोडलेली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us