Helicopter Crash : बद्रीनाथहून येणारं हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

Helicopter Crash : सतत कोसळणारा पाऊस आणि दाट ढगांमुळे दृश्यमानता खूप कमी आहे. बचाव मोहिमेतील टीम्स आणि हेलिकॉप्टर्सना शोध घेताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय.

Helicopter Crash : बद्रीनाथहून येणारं हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू
helicopter missing
| Updated on: Oct 30, 2026 | 3:40 PM

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ धामहून फाटाला जाणारं एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. जोशीमठ जवळ हाथी डोंगराच्या मागे चायी गावात जवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन टीमची शोध मोहिम सुरु  आहे. भारत कंपनीचं हे हेलिकॉप्टर असल्याचं सांगितलं जातय. बद्रीनाथ आणि जोशीमठ दरम्यान ही घटना घडली आहे. बद्रीनाथ आणि जोशीमठ दरम्यान ही घटना घडली आहे. हेलिकॉप्टरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लोकेशन मिळत नाहीय समजल्यानंतर हेलिकॉप्टरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु झाले. या मोहिमेत दोन अन्य हेलिकॉप्टर्सनाही लावण्यात आलं.

बद्रीनाथ धाम येथे दर्शन करुन परतणार एक हेलिकॉप्टर जोशीमठ क्षेत्रात अचानक बेपत्ता झालं. जोशीमठ मारवाडी क्षेत्रात चाय गावाच्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला. सतत कोसळणारा पाऊस आणि दाट ढगांमुळे दृश्यमानता खूप कमी आहे. बचाव मोहिमेतील टीम्स आणि हेलिकॉप्टर्सना शोध घेताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. बद्रीनाथ आणि जोशी मठ दरम्यानच्या भागात शोध मोहिम सुरु आहे.

Loading...

कुठल्या कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं

हेलिकॉप्टरमध्ये सहालोक असल्याची माहिती आहे. पॅसेंजर मेनिफेस्टनुसार हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा लोक होते. यात चंद्रकांत, राजश्री, दिनेश, आकाश आणि अथर्व अशी या प्रवाशांची नाव आहेत. त्या शिवाय वैमानिकही या हेलिकॉप्टर मध्ये होता. हिंमांशू असं या पायलटचं नाव आहे.  जोशीमठ भागात झालेल्या या हेलिकॉप्टर क्रॅशच्या दुर्देवी घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दु:ख व्यक्त केलय. ट्रान्स भारत कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं. त्याचा रजिस्ट्रेशन नंबर VT-HCX आहे.

दोन हेलिकॉप्टर्सची इमर्जन्सी लँडिंग

ऑक्टोंबर महिन्यात चारधाम यात्रेदरम्यान दोन हेलिकॉप्टर्सची इमर्जन्सी लँडिंग झाली होती. यातली एक घटना रुद्रप्रयागमध्ये खराब हवामानामुळे घडली. टिहरीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. अपर जिल्हाधिकारी चमोली विवेक प्रकाश यांनी सांगितलं की, हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर बचाव मोहिम सुरु झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us