AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! 2029 साठी भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला, अमित शाहांची मोठी घोषणा, थेट…

मोठी बातमी समोर येत आहे. 2029 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजप सलग तीन टर्मपासून सत्तेत आहे. दरम्यान त्यानंतर आता भाजपकडून आतापासूनच 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची देखील तयार सुरू करण्यात आली आहे.

मोठी बातमी! 2029 साठी भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला, अमित शाहांची मोठी घोषणा, थेट...
amit shahImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 4:25 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. 2029 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजप सलग तीन टर्मपासून सत्तेत आहे. दरम्यान त्यानंतर आता भाजपकडून आतापासूनच 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची देखील तयार सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

नरेंद्र मोदी हेच 2029 मध्ये देशाचे चौथ्यांदा पंतप्रधान होतीत, अशी घोषणा अमित शाह यांनी केली आहे. उत्तर प्रदेश भाजपाच्या नवर्निवाचित प्रदेश कार्यसमीतीच्या पहिल्या बैठकीमध्ये बोलताना शाह यांनी ही घोषणा केली आहे. या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बडे नेते हजर होते. या बैठकीमध्ये बोलताना नरेंद्र मोदी हेच चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार अशी घोषणा अमित शाह यांच्याकडून करण्यात आली आहे.

दरम्यान अमित शाह यांची ही घोषणा म्हणजे भाजपच्या नेत्यांसाठी आणि पक्षातील कार्यकर्त्यांसाठी एक प्रकारे स्पष्ट संदेश असल्याचं बोललं जात आहे. नेत्याने वयाचे 75 वर्ष पूर्ण झाले की सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा नियम पक्षात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय 76 वर्ष झालं आहे, अशा स्थितीमध्ये जर देशात पुन्हा भाजपची सत्ता आली तर पुढचा पंतप्रधान कोण होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या सर्व प्रश्नांचं उत्तर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी या बैठकीमध्ये दिलं आहे. पुढचे पंतप्रधान देखील नरेंद्र मोदी हेच असणार आहेत, ते कुठेही जात नाहीत, असा थेट संदेशच पक्षातील नेत्यांना आता अमित शाह यांनी दिला आहे.

तसेच त्यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांना एक खास संदेश देखील दिला आहे. तुम्ही सामान्य लोकांना सोबत घेऊन कार्य करा, जमिनीशी जोडलेले राहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तीन टर्म देशाचे पंतप्रधान बनले आहेत, ते चौथ्यांदा देखील देशाचे पंतप्रधान बनतील, असं यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे. यातूनच आता भाजपने 2029 च्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.

Follow Us
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात