AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Kelkar : माझ्या जीवाला धोका, आईला आणि बायको मुलांना…मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, मुख्यमंत्र्यांना टॅग करत म्हणाला…

Abhijeet Kelkar Post : मराठी अभिनेता अभिजीत केळकरनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Abhijeet Kelkar : माझ्या जीवाला धोका, आईला आणि बायको मुलांना...मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, मुख्यमंत्र्यांना टॅग करत म्हणाला...
| Updated on: Oct 30, 2026 | 4:16 PM
Share

मराठी अभिनेता अभिजीत केळकरने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत मुंबईतील मालाड पूर्व येथे असलेल्या चाळीवर काही लोकप्रतिनिधी आणि बिल्डर मिळून लोकांची घरं जमीनदोस्त करत असल्याचं त्यानं म्हटलं आहे . यासाठी लोकांना धमकावलं जात असल्याचा आरोपही अभिनेत्यानं केलाय. इतकंच नव्हे तर अभिजीतनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत याप्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

अभिजीत केळकरची पोस्ट

अभिजीत केळकरने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, माझ्या मनात देवेंद्र फडणवीस जी आणि एकनाथ शिंदे साहेब, आपल्याबद्दल अतीव प्रेम, आदर आणि विश्वास आहे…पण दिव्याखाली अंधार आहे… मालाड पूर्व, पुष्पापार्क, बाणडोंगरी ह्या आमच्या भागात असलेली आमची घरं हे आमचं सर्वस्व आहे, आमच्या आई वडीलांनी रक्ताचं पाणी करून, काडी काडी जमवून संसार केलेत, ही घरं उभारली आहेत, आम्ही लहानाचे मोठे इकडेच झालोय, ह्या चाळीतच, झोपडपट्टीत म्हणा हवं तर…गोरगरिबांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावून, त्यांना रस्त्यावर आणण्याचा यशस्वी प्रयत्न, लोकप्रतिनिधींकडून राजरोसपणे होतोय, बिल्डरने ह्या लोकप्रतिनिधींना आणि सगळ्या सिस्टीमना पैशाच्या जोरावर आपल्या हातातलं खेळणं केलंय, स्थानिक गुंडांना पाळून, लोकांना धमक्या देऊन, धड कुठलीही ऍग्रिमेंट न करता, कागदपत्र न दाखवता, लोकांची घरं जमीनदोस्त करतायत.’

‘ह्याचा अनुभव गेले सहा महिने मी घेतोय आणि त्यांच्याशी लढतोय (मला नावं घेऊन कोणाचीही बदनामी करायची नाहीये. म्हणून मी नावं घेत नाहीये, पण कदाचित नाईलाजाने मला पुढे जाऊन ती घ्यावी लागतील…मी कोणालाही घाबरत नाही…माझ्या जीवाला धोका आहे. पण मी घरी माझ्या आईला आणि बायको मुलांना सांगून निघालोय) आम्हाला आमची हक्काची घरं हवी आहेत आणि त्यासाठी आपली मदत हवी आहे, आम्ही पुनर्विकासाच्या विरोधात नक्कीच नाही, पण ज्या विकासाचा पायाच खोट्या कागदपत्रांवर उभारला जातोय, तो विकासच पोकळ आहे. आम्हाला न्याय हवाय, तो आपल्याकडून मिळेल ह्याबद्दल मला खात्री आहे…बाकी देवाक काळजी.’

 

तसेच अभिनेत्यानं आणखी एक पोस्ट शेअर करत जमीनदोस्त झालेल्या घराचे फोटो शेअर करत म्हटलं की, ‘कुठला बिल्डर पुनर्विकासामध्ये घरं अशा पद्धतीने, अर्धवट तोडतो? ना कुठे पत्रे मारले आहेत, ना मलिदा वाहून न्यायला, जोडलेला रस्ता आहे, ह्या जागेत जायला फक्त एका बाजूला माणसं जाऊ येऊ शकतील एवढा एक पूल आहे. जोडलेला रोडच नसताना कसा होणार आहे हा प्रोजेक्ट? मुळात ज्यांची जमीन आहे, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं NOC घेतलेलं नाही. त्यामुळे त्या जागेचे मालक कोर्टात गेलेले आहेत, उद्या सगळं जमीनदोस्त केल्यावर कोर्टाने प्रोजेक्टलाच स्टे दिला तर ना, लोकांना घरं मिळणार ना भाडं, कसा होणार आहे हा प्रोजेक्ट?’

‘शेजारी मिलिटरी कॅम्पस आहे, COD, त्यानुसार, ठराविक हद्दीत, ठराविक एका उंचीच्या वर इमारती बांधायला परवानगी असूच शकत नाही, जर घरं जमीनदोस्त केल्यावर, डिफेन्सने विरोध केला तर मग कसा होणार आहे हा प्रोजेक्ट?? लोकांना रोज रात्रंदिवस बिल्डरचे गुंड येऊन धमक्या देऊन घरं रिकामी करायला लावत आहेत आणि अर्धवट डॉक्युमेंट्स करून तात्काळ ही अशी अर्धवट तोडत आहेत, गेली 50-60 वर्षं तिथे राहिलेल्या पण बिल्डरला न घाबरणाऱ्या लोकांना SRA करवी, अपात्र करण्यात आलं आहे. गावगुंडांनी तिथे अनधिकृत झोपड्या बांधून त्या पात्र करून घेतल्या आहेत, हा SRA चा कारभार.’

‘हे सगळं मी ऐकीव बोलत नाहीये, हे सगळं मी ही भोगतोय…ह्या ऊपर जाऊन मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, तिकडच्या so called लोकप्रतिनिधींना विचारतो, आम्हाला चाळीतल्या लोकांना त्यांची हक्काची घरं मिळतील, अपात्र करण्यात आलेल्या लोकांना पात्र करतील, ह्याची जबाबदारी तुम्ही घेताय का? तसं लेखी देत असाल तर तुम्ही म्हणाल तिकडे आम्ही सह्या करू, बोला घेताय जबाबदारी?’ असं म्हणत अभिजीतनं संताप व्यक्त केला आहे.

Follow Us
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात