Varanasi Blast Case : वलीउल्लाहला फाशीची शिक्षा, वाराणसी बॉम्ब ब्लास्ट प्रकरण, 16 वर्षांनंतर गाझियाबाद सत्र न्यायालयाचा निर्णय

| Updated on: Jun 06, 2022 | 5:36 PM

वाराणसी बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी गाझियाबाद सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. 16 वर्षांनंतर आतंकवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Varanasi Blast Case : वलीउल्लाहला फाशीची शिक्षा, वाराणसी बॉम्ब ब्लास्ट प्रकरण, 16 वर्षांनंतर गाझियाबाद सत्र न्यायालयाचा निर्णय
Follow us on

वाराणसी : वाराणसी बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी (Varanasi Blast Case) गाझियाबाद सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. 16 वर्षांनंतर आतंकवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी वलीउल्लाहला (Terrorist Waliullah) याआधीच न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या बेंच समोर ही सुनावणी झाली. मार्च 2006 रोजी वाराणसीतील संकटमोचन मंदिर आणि कॅन्ट स्टेशनवर मालिका बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणी तब्बल 16 वर्षांनंतर निकाल सुनावण्यात आला आहे.

वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

वाराणसीमध्ये 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गाझियाबाद सत्र न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या स्फोटातील दोषी वलीउल्लाहला जन्मठेप आणि फाशी अश्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. वलीउल्लाहला एका प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

वाराणसी बॉम्ब ब्लास्ट प्रकरण

7 मार्च 2006 ला वाराणसीत बॉब्बस्फोट झाला. संकटमोचन मंदिर आणि रेल्वे कॅन्टीन परिसरात हा बॉम्ब ब्लास्ट झाला होता. या बॉम्बस्फोटानंतर एकच गोंधळ उडाला. यासोबतच दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडला होता. तिथे झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला. तर शेकडो लोक जखमी झाले.

हे सुद्धा वाचा

23 मेला वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. सुनावणी सुरू होण्यापूर्वी आरोपी वलीउल्लाहला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर या प्रकरणात पुढची तारीख देण्यात आली होती. अखेर आज या प्रकरणी निकाल लागला आहे. वलीउल्लाहला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

वलीउल्लाह कोण आहे?

वलीउल्लाह खानचे अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत. त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. तोवाराणसी साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड मानला जातो. वलीउल्लाह खान हा प्रयागराजमधील फुलपूरचा रहिवासी आहे. पोलिसांनी या स्फोटांच्या तपासादरम्यान 2006 मध्ये लखनौमधून त्याला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.