VIDEO : सपना चौधरीच्या गाण्यावर महिला आयपीएस अधिकाऱ्याचा डान्स

नवी दिल्ली : डान्सर सपना चौधरीच्या गाण्यावर दिल्लीच्या महिला पोलीस कर्मचारी आणि आयपीएस अधिकारी थिरकत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑल वुमन संपर्क सभेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सुनो सहेली कार्यक्रमा’मधील हा व्हिडीओ आहे. या कार्यक्रमावेळी महिला पोलिसांनी स्टेजवर सपनाचं प्रसिद्ध गाणं ‘तेरी आख्यो का यो काजल’ या गाण्यावर डान्स केला. विशेष म्हणजे …

VIDEO : सपना चौधरीच्या गाण्यावर महिला आयपीएस अधिकाऱ्याचा डान्स

नवी दिल्ली : डान्सर सपना चौधरीच्या गाण्यावर दिल्लीच्या महिला पोलीस कर्मचारी आणि आयपीएस अधिकारी थिरकत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑल वुमन संपर्क सभेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सुनो सहेली कार्यक्रमा’मधील हा व्हिडीओ आहे. या कार्यक्रमावेळी महिला पोलिसांनी स्टेजवर सपनाचं प्रसिद्ध गाणं ‘तेरी आख्यो का यो काजल’ या गाण्यावर डान्स केला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम महिलांना प्रोत्साहीत करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

सपना चौधरीचे ‘तेरी आख्या का यो काजल’ हे गाणं खूप प्रसिद्ध आहे. कार्यक्रमावेळी हे गाणं सुरु होताच एक-दोन महिला पोलिस कर्माचाऱ्यांनी डान्स करण्यास सुरुवात केली. यानंतर अजून काही महिला पोलीस थेट स्टेजवर जात सपनाच्या गाण्यावर डान्स करु लागल्या. दरम्यान एका महिला पोलीसाने आयपीएस बेनिता मेरी जेकर यांचा हात पकडत डान्स करु लागली यावेळी सभागृहात एकच जल्लोष झाला.


सपना चौधरी आपल्या गाण्यांमुळे तसेच डान्स शो आणि बिग बॉस 11 मुळे तिला लोकप्रियता मिळाली. सपनाने आपल्या करिअरची सुरुवात आर्केस्ट्रा पार्टीपासून केली होती. यानंतर तिने मोठे यश मिळवले. सपनाने सध्या भोजपूरी, पंजाबी, हरियाणवी आणि बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच तिने ‘दोस्ती के साइड इफेक्टस’ या सिनेमातून तिने आपल्या अभिनयाचेही दर्शन दिले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *