मोठी बातमी! सरकारचं टेन्शन वाढलं, जे. पी. नड्डा यांच्या घरी नेमकं काय घडलं? आता कॉकरोच जनता पार्टीची सर्वात मोठी घोषणा
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू असतानाच कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी मंत्री जे. पीय नड्डा यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आज संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे संसद परिसरात मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले.पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा करण्यात आला. तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला, दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हे आंदोलन सुरू असतानाच आता कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे. सैरभ दास यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. आम्हाला त्यांनी असा विश्वास दिला आहे की, ते या प्रकरणात योग्य स्थरावर चर्चा करतील, असं दास यांनी म्हटलं आहे.
सौरभ दास यांनी ट्विटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. ” आशुतोष रांका आणि मी दुपारी 12 वाजता केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या घरी गेलो होतो. आम्ही त्यांना आमच्या मागण्या सांगितल्या, ज्यामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, किंवा त्यांना पदावरून काढून टाकावे या मागणीचा समावेश आहे. यावेळी जे.पी. नड्डा यांनी आम्हाला असा विश्वास दिला आहे की ते या प्रकरणात योग्य स्थरावर चर्चा करतील. परंतु त्यांनी अजून तसं आम्हाला कोणतंही पक्क आश्वासन दिलेलं नाहीये, त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन सुरूच राहील असं सौरभ दास यांनी म्हटलं आहे. दरम्यान आंदोलन सुरूच राहणार असल्यामुळे आता सरकारीच डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या तीन प्रमुख मागण्या
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला कोणताही अडथळा निर्माण न करता त्यांची सुटका करावी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, तसेच नीट पेपर लीक प्रकरणात ज्या -ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक कोटींची मदत करावी अशा तीन प्रमुख मागण्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.