जनगणनेच्या प्रश्नांची उत्तर चुकीची दिली तर काय होईल? शिक्षा होते का?

देशभरात 2027 पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात काही महत्त्वाचे आणि नवे अपडेट सरकाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत. अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे की? समजा जर चुकीची उत्तर दिली तर काय होऊ शकतं?

जनगणनेच्या प्रश्नांची उत्तर चुकीची दिली तर काय होईल? शिक्षा होते का?
census
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 10:02 PM

देशभरात 2027 पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात काही महत्त्वाचे आणि नवे अपडेट सरकाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत. यावेळची जनगणना ही पूर्णपणे अत्याधुनिक पद्धतीने होणार आहे. ज्यामध्ये मोबाईल अॅप आणि ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला स्वत:ची आणि कुटुंबाची माहिती स्वत:च भरता येणार आहे. मात्र जरी ही नवीन आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी देखील जनगणना संदर्भात अनेक अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात असल्याचं देखील पाहयला मिळत आहे, त्यातून भीतीचं वातावरण निर्माण होत आहे.

सध्या तरी अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे, की जर समजा ऑनलाईन फॉर्म भरताना नजर चुकीने चुकीची माहिती भरली गेली किंवा एखाद्या व्यक्तीने मुद्दाम चुकीची माहिती भरली तर अशा परिस्थितीमध्ये काय शिक्षा होऊ शकते, अशा व्यक्तीला पोलीस अटक करतात का? जनगणना संदर्भात जे नियम सरकारने बनवले आहेत, त्याआधारे जाणून घेऊयात की, समजा एखाद्या व्यक्तीने चुकीची माहिती दिली तर त्याला काय शिक्ष होऊ शकते?

Loading...

कलम 1948

कलम 1948 अंतर्गत जनगणनेच्या वेळी चुकीची माहिती देणं हा एक गुन्हा आहे.कलम 1948 अंतर्गत प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की जनगणनेच्या वेळी विचारण्यात येणार्‍या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य आणि जबाबदारीपूर्वकच दिलं गेलं पाहिजे. चुकीची उत्तर देणं दंडनीय अपराध आहे. त्यासाठी तुम्हाला दंड होऊ शकतो. आता अनेकांच्या मनात असा देखील प्रश्न आहे की, जर चुकीचं उत्तर दिलं तर अटक होते का? तर असं काही होत नाही, समजा तुम्ही चुकीची माहिती दिली आहे, हे सिद्ध झालं तर तुमच्याकडून एक हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जाऊ शकतो. मात्र काही गंभीर गुन्ह्यामध्ये तुम्हाला जेलमध्ये देखील जावं लागू शकतं, अशीही तरतूद आहे. त्यामुळे जनगणनेत्या वेळी विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नाची उत्तर योग्य आणि जबाबदारीपूर्वक देणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us