भुसावळ येथे तरुणावर अचानक अज्ञातांकडून गोळीबार, घटनेनंतर मोठी खळबळ
एका तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना भुसावळ येथे घडली आहे. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

एका तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना भुसावळ येथे घडली आहे. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. गोळीबाराचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
भुसावळ येथील वरणगावात एका तरुणावर अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटना स्थळी पंचनामा करुन तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर भुसावळ सह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तरुणाची प्रकृती चिंताजनक
भुसावळच्या वरणगावात मुक्ताईनगरच्या एका तरुणावर गोळीबार झाला आहे. या घटनेत सरफराज सय्यद नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा तरुण मुक्ताईनगर येथील काजीपुरा, जुने गाव येथील रहिवासी आहे.या गोळीबारात हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
