What India Thinks Today | शेतकरी आंदोलनावर तोडगा काय? कृषी मंत्री अर्जुन मुंडा सांगणार मार्ग

‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’च्या दुसऱ्या वर्षात 'सत्ता सम्मेलन' मध्ये जय किसान, क्या समाधान' सत्रात केंद्रीय कृषी मंत्री सहभागी होतील. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या समस्यांवर कसा मार्ग काढता येईल या बद्दल केंद्रीय कृषी मंत्री बोलू शकतात.

What India Thinks Today | शेतकरी आंदोलनावर तोडगा काय? कृषी मंत्री अर्जुन मुंडा सांगणार मार्ग
What India Thinks Today arjun munda
| Updated on: Feb 24, 2024 | 10:30 AM

नवी दिल्ली : ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ चा मंच पुन्हा एकदा तयार आहे. देशातील सर्वात मोठ न्यूज नेटवर्क टीवी 9 ने हा मंच उपलब्ध करुन दिलाय. जगभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी या मंचावरुन आपल म्हणणं मोकळेपणाने मांडू शकतील. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या तिसऱ्यादिवशी 27 फेब्रुवारीला ‘सत्ता सम्मेलन’मध्ये केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री सहभागी होणार आहेत. देशातील अन्नदात्याची नाराजी आणि आंदोलन संपवण्याचा तोडगा काय? यावर केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा बोलू शकतात.

राजधानी दिल्लीत होणाऱ्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’च हे दुसर वर्ष आहे. यंदा ‘सत्ता सम्मेलन’ मध्ये ‘जय किसान, क्या समाधान’ या सत्रात केंद्रीय कृषीमंत्री सहभागी होतील. शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या समस्यांवर तोडगा काय? यावर बोलू शकतात. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अनेक टप्प्यांची बोलणी झाली आहेत. पण सर्वच चर्चा अयशस्वी ठरल्या आहेत. शेतकरी आता आपल्या आंदोलनाचा जोर आणखी वाढवू शकतात.

केंद्रीय कृषी मंत्री काय बोलणार?

“चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर काही गोष्टींवर सहमतीसाठी आणखी मेहनत करावी लागेल. मोदी सरकार शेतकरी हिताच्या मुद्यावर काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. आतापर्यंत चार फेऱ्यांमध्य समाधानकारक चर्चा झालीय. सर्वांच्या हिताचा तोडगा निघावा, हीच आमची इच्छा आहे. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. आम्ही पुन्हा चर्चेसाठी तयार आहोत” असं केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा शेतकरी आंदोलनाबद्दल म्हणाले. सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दलही कृषी मंत्री टीव्ही 9 च्या मंचावरुन बोलू शकतात.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी हरियाणा आणि पंजाब बॉर्डरवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंजाब आणि हरियाणातील अनेक जिल्ह्यात इंटरनेट बंद आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांसाठी पेन्शन, पोलीसात दाखल तक्रारी मागे घेणे, 2021 लखीमपुर खीरी हिंसाचारा पीडितांना न्याय, वीजदर न वाढवणे आणि 2020-21 च्या आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

भारताची शौर्यगाथा उलगडणार

TV 9 चा ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ हा एक वैचारिक मंच आहे. जगभरातील तज्ज्ञ मंडळी तिथे येऊन आपल मत मांडतात. कॉनक्लेवच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी 27 फेब्रुवारीला ‘सत्ता सम्मेलन’च्या सुरुवातीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नव्या भारताच्या शौर्यगाथेबद्दल सांगतील.