त्या रात्री नेमकं काय घडलं? महालामधून अचानक 250 लोक एकाएकी गायब झाले, 300 वर्षांनंतर कॅमेऱ्यात कैद झाला भयानक व्हिडीओ

तुम्ही जेव्हा 'हॉन्टेड प्लेस' बाबत विचार करता तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या मनात अलवरमध्ये असलेल्या भानगढ किल्ल्याचं नाव येतं. ही घटना याच किल्ल्यावर घडली आहे.

त्या रात्री नेमकं काय घडलं? महालामधून अचानक 250 लोक एकाएकी गायब झाले, 300 वर्षांनंतर कॅमेऱ्यात कैद झाला भयानक व्हिडीओ
| Updated on: Jan 25, 2025 | 5:54 PM

तुम्ही जेव्हा ‘हॉन्टेड प्लेस’ बाबत विचार करता तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या मनात अलवरमध्ये असलेल्या भानगढ किल्ल्याचं नाव येतं. हा भानगढचा किल्ला देशाची राजधानी दिल्ली आणि राजस्थानची राजधानी जयपूर या दोघांच्यामध्ये असलेल्या अलवर जिल्ह्यातल्या सरिस्का परिसरामध्ये आहे.या किल्ल्यावर अनेक मंदिरं, बाजार आणि राजा, राणींचे महाल आहेत. मात्र काळाच्या ओघात इथली एकही वस्तू सुस्थितीमध्ये राहिली नाही. देवांच्या मूर्तीपासून ते राजाच्या महालापर्यंत सर्व वस्तू तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. असं म्हटलं जातं की एका श्रापामुळे या किल्ल्याची ही अवस्था झाली आहे.भानगढला भुतांचं शहर असं देखील म्हटलं जातं.

भानगढचा किल्ला जयपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर तर दिल्लीपासून 300 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या किल्ल्यामध्ये भूत असल्याचं मानलं जातं. जगभरात ‘हॉन्टेड प्लेस’ अशी या किल्ल्याची ओळख आहे. हा किल्ला आधी खूप सुंदर आणि रचनात्मक होता, मात्र आता या किल्ल्याचे केवळ आवशेष शिल्लक राहिले आहेत, एका तांत्रिकाच्या श्रापामुळे या किल्ल्याची अशी अवस्था झाल्याचं बोललं जातं.एका तांत्रिकाच्या श्रापामुळे किल्ला पूर्ण होण्यापूर्वीच कोसळला, त्यामुळे या किल्ल्यामध्ये राहाणारे तब्बल 250 लोक या किल्ल्यामध्ये गाडले गेले. आजही त्यांचा आत्मा या किल्ल्यात वास करतो अशी मान्यता आहे. त्यामुळे सुर्यास्तानंतर या किल्ल्यामध्ये कोणालाही जायला परवानगी नाही.

काय होता श्राप?

भानगढची राजकन्या खूप सुंदर होती. राज्यभर तिच्या सुंदरतेची चर्चा होत असे. प्रत्येक जण तिच्यासोबत विवाह करण्यासाठी इच्छूक होता. भानगढमध्ये एक तरुण राहात होता, तो राजकन्येला पाहाताच तिच्या प्रेमात पडला, तो काळ्या जादूमध्ये निपून होता. त्यामुळे त्याने राजकन्येला वश करण्यासाठी काळ्या जादूचा उपयोग करण्याचे ठरवले, राजकुमारी ज्या अत्तराच्या दुकानात अत्तर खरेदी करण्यासाठी येते त्या दुकानातील अत्तरावर त्याने काळी जादू केली. मात्र ही गोष्ट त्या राजकन्येला माहिती पडली, तीने दगड मारून ती अत्तराची कूपी फोडली. ते अत्तर ज्या दगडावर पडलं तो दगड मात्रिकाच्या मागे लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, मात्र मरताना त्याने या किल्ल्याला श्राप दिला होता. त्याच्या श्रापामुळे मध्यरात्रीच्या सुमारास हा किल्ला कोसळला आणि किल्ल्यात राहात असलेल्या सर्वांचा या घटनेत मृत्यू झाला. आजही त्यांचा आत्मा या वास्तूत असल्याचं बोललं जातं. दरम्यान काही जणांकडून असा देखील दावा केला जातो की, रात्रीच्या वेळी इथे काही व्हिडीओ काढण्यात आले, ज्यामध्ये काही पॅरानॉर्मल घटना कैद झाल्या आहेत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)