भारतीय रेल्वेने दिली मोठी माहिती, लवकरच धावणार वंदेभारत स्लीपर ट्रेन? , पाहा काय घडामोड?

Vande Bharat Sleeper Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ८ नोव्हेंबर रोजी चार नव्या वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला आहे. परंतू देशाची पहिली वंदेभारत स्लीपर ट्रेनचा अद्याप शुभारंभ झालेला नाही.

भारतीय रेल्वेने दिली मोठी माहिती, लवकरच धावणार वंदेभारत स्लीपर ट्रेन? , पाहा काय घडामोड?
Vande Bharat Sleeper Train
| Updated on: Nov 10, 2025 | 6:23 PM

भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेन संदर्भात मोठी माहिती दिली आहे. याआधी भारतीय रेल्वेने ऑक्टोबर २०२५ मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार असे म्हटले होते. आता ऑक्टोबर तर संपला आहे त्यामुळे वंदेभारत स्लीपर नेमकी कधी धावणार याची उत्सुकता लागली आहे. आतापर्यंत रेल्वेने वंदेभारत स्लीपरच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. उत्तर पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की देशाच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर कोच मेन्टेनन्स सर्व्हीसचा डेपो हा २०२६ मध्यापर्यंत राजस्थानच्या जोधपूरात तयार होणार आहे.ही अत्याधुनिक सर्व्हीस फॅसिलिटी ‘भगत की कोठी’ रेल्वे स्थानक परिसरात ३६० कोटी रुपये खर्चून तयार केली जात आहे.

रेल्वेच्या तांत्रिक क्षमतेत होणार वाढ

हा वंदेभारत देखभाल आणि दुरुस्ती डेपो रेल्वेच्या तांत्रिक क्षमतेला एका उंचीवर नेणार असल्याचे उत्तर पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंते मेजर अमित स्वामी यांनी सांगितले. या डेपोचा पहिला टप्पा जून २०२६ पर्यंत तयार होईल, ज्यात ६०० मीटर लांबीचा ट्रॅक तयार केला जात आहे. जो २४ वंदे भारत स्लीपर कोच मेन्टेनन्सची सुविधा देईल. तसेच दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ज्यात १७८ मीटरचा अतिरिक्त ट्रॅक, वर्कशॉप आणि सिम्युलेटरची सुविधा मिळणार आहे.

मेन्टेनन्स डेपो लवकर होणार रेडी

हा देखभाल आणि दुरुस्ती डेपो खास करुन वंदे भारत स्लीपर कोचच्या सर्व्हीसिंग साठी तयार केला जात आहे. यात अत्याधुनिक व्हील रॅक सिस्टीम, विशेष परीक्षण प्रयोगशाळा आणि नवीन ट्रेनिंग सिम्युलेटर लावले जाणार आहेत. या सुविधांमुळे ट्रेनच्या देखभालीत अचुकता आणि सुरक्षा वाढणार आहे. डेपोत एकाच वेळी तीन ट्रेनची तपासणी आणि सर्व्हीसिंग करणे शक्य आहे. येथील आधुनिक मशिनरीत असे तंत्रज्ञानाचा समावेश आहे ज्यामुळे संपूर्ण ट्रेन रेकला उचलणे शक्य आहे. बोगींना बदलता येऊ शकते आणि व्हील टर्निंग सिस्टीमद्वारे निर्धोकपणे देखभाल करता येणार आहे.

भारत आणि रशियाच्या संयुक्त कंपनीचे काम

वंदेभारत स्लीपर कोचच्या देखभाल डेपोची उभारणी उत्तर पश्चिम रेल्वेद्वारे केली जात आहे. तर तांत्रिक भागीदारी रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) आणि कायनेट रेल्वे सॉल्यूशन यांची आहे. ही भारत आणि रशियाची संयुक्त कंपनी या प्रोजेक्टवर काम करत आहे. पहिल्या टप्प्याचा खर्च १६७ कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्याचा खर्च १९५ कोटी रुपये म्हटला जात आहे. मेजर स्वामी यांनी सांगितले की येथे रोज आठ ते नऊ वंदेभारत ट्रेनच्या मेन्टेनन्सचे क्षमता आहे. प्रत्येक ट्रेनने दर चार दिवसांनी ३,५०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर येथे तिला मेन्टेनन्ससाठी आणले जाणार आहे.