जगात असा कोणता मुस्लीम देश आहे? तेथील लोकं भारतातल्या हिंदूंवर सर्वाधिक प्रेम करतात; उत्तर ऐकूण बसले धक्का!

अनेक देशांमध्ये दुसऱ्या देशातील धर्माबाबत, संप्रदायाबाबत, तेथील परंपरांबाबत आदर बाळगला जातो. असाच एक रिपोर्ट आता समोर आला आहे.

जगात असा कोणता मुस्लीम देश आहे? तेथील लोकं भारतातल्या हिंदूंवर सर्वाधिक प्रेम करतात; उत्तर ऐकूण बसले धक्का!
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 7:08 PM

सध्या जगामध्ये अनेक ठिकाणी युद्धाचं वातावरण आहे, दोन देशांमध्ये अपसात तणाव दिसून येत आहे. इस्रायल आणि इराकमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये देखील युद्ध सुरू आहे. आज प्रत्येक देशाकडे अत्याधुनिक शस्त्रांचा साठा आहे. जर तणाव वाढतच गेला तर या युद्धाची किंमत जगातील प्रत्येक देशाला मोजावी लागणार आहे. युद्ध हे जस मोठं संकट आहे, तसंच आणखी एक मोठं संकट आहे ते म्हणजे सांप्रदायिक भांडणं, दोन समाजामध्ये असलेला तणाव. जर एखादा व्यक्ती आपला देश सोडून इतर देशात राहत असेल तर त्याच्यासोबत वंशवादाच्या मुद्द्यावरून होणारा भेदभाव हे देखील जगासमोरचं मोठं संकट आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये देखील गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचं वातावरण आहे, पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादी कारवाया सुरू असतात, मात्र भारताकडून देखील तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे.

अनेकदा धर्माच्या नावाखाली काही लोकांकडून दंगली देखील भडकवण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू असतो. अनेक देशांमध्ये धर्माच्या नावाखाली दंगली, बॉम्बस्फोट यासारख्या घटना घडल्याची उदाहरण आहेत. तर अनेकदा एका देशातून दुसऱ्या देशात वास्तव्यासाठी गेलेल्या लोकांना वंशवादाचा बळी व्हावं लागतं. अशी अनेक उदाहरण गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेसारखा प्रगत देशांमध्ये देखील घडली आहेत. वंशवादाच्या मुद्द्यावरून अनेकांवर हल्ले झाले आहेत, त्यात काही जणांना तर आपला जीव देखील गमावावा लागला आहे.

मात्र अजूनही अनेक ठिकाणी एकमेकांच्या धर्माबाबत, संप्रदायाबाबत, देशाबाबत आदर बाळगला जातो. त्या व्यक्तीबाबत प्रेम, जिव्हाळा, आपुलकीची भावना जोपासली जाते. याच सर्व पार्श्वभूमीवर AI ला नुकताच एक प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न असा होता की जगात असा कोणता मुस्लीम देश आहे जिथे राहणारे लोक भारतीयांवर सर्वात जास्त प्रेम करतात, हिंदूंचा आदर, सन्मान करतात?

AI नं याबाबत दिलेल्या रिपोर्टनुसार इंडोनेशियामधील मुस्लिम हे भारतीय लोकांवर सर्वाधिक प्रेम करतात, त्यांच्या प्रथा परंपरांचा आदर करतात.AI च्या रिपोर्टनुसार इंडोनेशियामधील 71 टक्के मुस्लीम समाज हा हिंदू धर्म आणि भारतीय प्रथा, परंपरांचा आदर करतो. तर त्यानंतर दुसरा क्रमांक हा मलेशियाचा आणि तिसरा क्रमांक हा तुर्कस्थानचा आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.