Judge Ravikumar Diwakar : यूपीत चार महिन्यात 22 दोषींना फाशीची शिक्षा देणाऱ्या न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्यासोबत असं घडलं

Judge Ravikumar Diwakar : यूपीमधील एक जज रवी कुमार दिवाकर सध्या चर्चेत आहेत. कारण त्यांच्या निर्णयांचा धडाकाच तसा आहे. चार महिन्यात त्यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांनी 22 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे रवी कुमार दिवाकर कोण आहेत? त्यांच्यासोबत काय घडलं? जाणून घ्या.

Judge Ravikumar Diwakar : यूपीत चार महिन्यात 22 दोषींना फाशीची शिक्षा देणाऱ्या न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्यासोबत असं घडलं
Judge Ravikumar Diwakar
| Updated on: Aug 22, 2026 | 8:27 AM

कोर्टाची पायरी चढू नये हे वाक्य अनेकदा आपल्या कानावर पडलं आहे. कारण एकदा एखादा विषय कोर्टात गेला की, न्याय कधीपर्यंत मिळेल याची खात्री नसते. न्यायासाठी सर्वसामान्यांना कोर्टाच्या वारंवार चकरा माराव्या लागल्याची अनेक उदहारण आपण पाहतो. भारतात न्यायादानाची प्रक्रिया गतिमान झाली पाहिजे, हे सुद्धा आपण अनेकदा ऐकलं आहे. कारण भारतीय न्यायालयात खटले वर्षानुवर्ष चालतात.पण उत्तर प्रदेशातील एक न्यायाधीश मात्र याला अपवाद ठरले आहेत. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रवी कुमार दिवाकर हे त्यांच्या झटपट न्यायदानाच्या निर्णयांमुळे चर्चेत आहेत. पण आता जिल्हा सत्र न्यायाधीश बीरेंद्र कुमार सिंह यांनी एक आदेश दिलाय. त्यानुसार न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्या कोर्टातील 97 प्रलंबित प्रकरणाच्या फाईल्स त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या आहेत.

या आदेशामागचं कारण स्पष्ट नाहीय. पण मागच्या आठ महिन्यात रवी कुमार दिवाकर यांनी 10 प्रकरणात 22 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मंगळवारी एक आदेश जारी करुन रवी कुमार दिवाकर यांच्या कोर्टातील खटले त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. मुजफ्फरनगरमध्ये त्यांनी 22 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. आतापर्यंत रवी कुमार दिवाकर यांनी एकूण 35 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. बरेलीमध्ये असताना त्यांनी 13 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. जो पर्यंत उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब होत नाही, तो पर्यंत त्यांनी सुनावलेल्या कुठल्याही फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी होणार नाही.

कोण आहेत न्यायाधीश रवी कुमार दिवाकर ?

जज रवी कुमार दिवाकर यांनी वर्ष 2022 मध्ये वारणसीच्या ज्ञानवापी परिसर वीडियोग्राफी सर्वे करण्याचा आदेश दिलेला. मूळचे लखनऊनचे असलेले रवी कुमार यांनी BCom आणि LLM डिग्री घेतली आहे. ते आपल्या कठोर निर्णयांसाठी ओळखले जातात. 2009 साली आजमगढ येथून अतिरिक्त सविल जज म्हणून रवी कुमार दिवाकर यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. मे 2015 मध्ये सुल्तानपूर येथे सिविल जज म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 5 महिन्यानंतर ते ज्यूडिशियल मजिस्ट्रेट बनले. नोव्हेंबर 2025 पासून ते मुजफ्फरनगर मध्ये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे.

कुठल्या प्रकरणांमध्ये रवी कुमार दिवाकर यांनी सुनावली फाशीची शिक्षा?

1 ) जज रवी कुमार दिवाकर यांनी 13 ऑगस्टला 12 वर्ष जुन्या मर्डर केसमध्ये 4 लोकांना फाशीची शिक्षा सुनावली. 14 जुलै 2014 साली शामली येथे पवन कुमार यांच्यावर गोळी झाडण्यात आली. त्यांचा भाऊ अशोक कुमार जखमी झालेला. जजने रामवीर, राजीव, राहुल आणि हरेंद्र कुमार यांना फाशीची शिक्षा सुनावली व 17 लाख रुपये दंड ठोठावला.

2 ) 12 ऑगस्टला जज रवी कुमार यांनी 27 वर्ष जुन्या लाकूड व्यापाऱ्याच्या अपहरण आणि मर्डर केसमध्ये एक व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली. सलीमला किडनॅप करुन शाहनवाजने 5 लाख रुपयांची खंडणी मागितलेली. पण खंडणीचे पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर 9 डिसेंबर 1999 रोजी चपरच्या जंगलात सलीमची गळा कापून हत्या करण्यात आली.

3 ) शामली जिल्ह्यात 20 ऑगस्ट 2011 रोजी एका शेतकऱ्याची हत्या झाली होती. या प्रकरणात जज रवी कुमार दिवाकर यांनी 17 जुलैला चार जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शेतकरी राज सिंह मित्र बिजेंद्र सोबत बाइकवरुन बहिणीच्या घरी चाललेले. त्यावेळी रस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून लुटण्याचा प्रयत्न केला. राज सिंहने विरोध करताच त्यांना गोळी मारण्यात आली. बिजेंद्र यांना बांधून ऊसाच्या शेतात फेकून देण्यात आले.

4 ) 24 ऑगस्ट 2010 रोजी राजबीर सिंह यांची गोळी घालून हत्या करण्यात आलेली. या प्रकरणात माजी ग्राम प्रधान प्रमोद आणि त्यांचा सहकारी सहदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली. पंचायत निवडणुकीतील दुश्मनीमुळे राजबीर यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला. 6 जुलैला या प्रकरणात निर्णय दिला.

5 ) 2 जुलैला जज रवी कुमार दीवाकर यांनी होम गार्ड रतीराम मर्डर केसमध्ये दीपक नावाच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली. 4 जून 2020 रोजी रतीराम ड्युटीवर होते. आरोपी दीपक त्याच्या आईला मारहाण करत होता. रतीराम यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर दीपकने चाकूने भोसकून त्यांची हत्या केली.

6 ) 20 जून रोजी राजेंद्र सैनी मर्डर केसमध्ये गजेंद्र आणि रामकिरण या दोन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली.

7 ) 30 मे रोजी 15 वर्ष जुन्या प्रकरणात महिला आणि तिच्या 6 वर्षाच्या मुलाच्या मर्डर केसमध्ये 50 वर्षाच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली.

8 ) 28 एप्रिलला 2019 सालच्या मर्डर केसमध्ये महिला आणि तिच्या तीन मुलांना फाशीची शिक्षा सुनावली.

9 ) 6 एप्रिल रोजी वकिल मोहम्मद समीर अपहरण आणि हत्या प्रकरणात 3 दोषींना फाशी सुनावली. 15 ऑक्टोंबर 2019 रोजी 45 लाख रुपयांच्या आर्थिक वाद प्रकरणात मोहम्मद समीरचं अपहरण करुन हत्या करण्यात आलेली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us