AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? पहिला सर्व्हे समोर, धक्कादायक निकालाची शक्यता, भाजपला थेट…

मोठी बातमी समोर येत आहे, उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार? कोणाला किती जागा मिळणार याचा एक सर्व्हे आता समोर आला आहे. धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? पहिला सर्व्हे समोर, धक्कादायक निकालाची शक्यता, भाजपला थेट...
uttar Pradesh Assembly elections Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 4:29 PM
Share

उत्तर प्रदेशमध्ये आता लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस हे चार प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. या प्रमुख पक्षांसह इतरही काही छोटे-मोठे पक्ष ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान यावेळी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार? कोण बाजी मारणार याचा एक सर्व्हे आता समोर आला आहे. न्यूज लीडर आणि मॅटराइज यांचा हा सर्व्हे आहे. या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलण्याची शक्यता आहे.

काय सांगतो सर्व्हे?

या सर्व्हेनुसार पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचं जनमत भाजपच्या दिशेनं झुकण्याची शक्यता आहे. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय होऊ शकतो, असं या सर्व्हेमधून समोर आलेली आकडेवारी सांगत आहे. भाजप प्रणित एनडीएला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये 267 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर समाजवादी पार्टी आघाडीला 132 जागांवरच समाधान मानावं लागेल असा दावा या सर्व्हेमध्ये करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मायावती यांच्या बसपाला दोन आणि इतर पक्षांना एक ते दोन सीट मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमधून व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत, त्यापैकी भाजप प्रणित एनडीएला 267 जागा मिळण्याचा अंदाज आहे. एकट्या भाजपला या राज्यात 246 जागा मिळू शकतात असा दावा या सर्व्हेमधून करण्यात आला आहे. याचाच अर्थ या सर्व्हेची आकडेवारी खरी ठरल्यास भाजप कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता उत्तर प्रदेशमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करू शकतं. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अपना दल (S) ला नऊ जागा आरएलडीला तीन तर निषाद पार्टीला चार जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमधून व्यक्त करण्यात आला आहे. जर आज निवडणुका झाल्या तर उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा दावा या सर्व्हेमध्ये करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे विरोधी पक्षांना 132 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अखिलेश यादव यांच्या सपाला सर्वाधिक 125 जागा मिळतील तर काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या सात जागा येऊ शकतात, असा दावा देखील या सर्व्हेमध्ये करण्यात आला आहे.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह