
मानसिक तणावाने अनेक लोक नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. यातील अनेक जण मृत्यूला कवठाळत आहेत. अशा प्रकारे स्वत:चे आयुष्य संपवणाऱ्यात भारतात पुरुषाचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशात दरदिवशी ४६८ हून अधिक लोक स्वत:चे लाख मोलाचे प्राण गमावत आहेत. त्यात ७२ टक्के पुरुषांचे प्रमाण आहे. दरवर्षी मे महिना मानसिक आरोग्य जागरुकता मास म्हणून साजरा केला जातो. यंदाची थीम ‘In Every Story, There’s Strength’ अशी होती. यावेळी पुरुषांच्या मेंटल हेल्थ संदर्भात अधिक लक्ष पुरवण्यात आले होते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ( NCRB ) च्या २०२२ च्या अहवालानुसार साल २०२२ मध्ये १ लाख ७१ हजार लोकांनी आत्महत्या केली होती. देशात आत्महत्येने प्रमाणाने रेकॉर्ड तोडला आहे. यामुळे जगात सर्वाधिक आत्महत्या करणाऱ्यात भारताचे नाव पहिल्या क्रमांकावर आले आहे. ही खरी तर लाजीरवाणी गोष्ट आहे. ...