CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात उतरणार का? सोनम वांगचूक म्हणाले..

Sonam Wangchuk : ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा पाहिजेच, अन्यथा जंतर-मंतरवर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. पण यावेळी सोनम वांगचुक सीजेपीच्या आंदोलनाचं समर्थन करणार का? याचं उत्तर त्यांनी स्वत: दिलं.

CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात उतरणार का? सोनम वांगचूक म्हणाले..
sonam wangchuk-abhijeet dipke
| Updated on: Sep 27, 2026 | 3:43 PM

कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘इलेक्शन कमीशन ठीक करा’ नावाचं अभियान त्यांनी सुरु केलं आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा पाहिजेच, अन्यथा जंतर-मंतरवर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. पण यावेळी सोनम वांगचुक सीजेपीच्या आंदोलनाचं समर्थन करणार का? याचं उत्तर त्यांनी स्वत: दिलं. वांगचूक म्हणाले की, ‘असे मुद्दे उचलणाऱ्या संघटनांचं मी समर्थन करतो. पण प्रत्येक आंदोलनात सहभागी होणं शक्य नाही’

“असे मुद्दे उचलणाऱ्या सर्व संघटना आणि नेत्यांचं मी समर्थन करतो. यामुळे निवडणूक प्रक्रिया अजून पारदर्शक होईल. जबाबदारी निश्चित होईल. मागणी योग्य आहे” असं सोनम वांगचूक ANI शी बोलताना म्हणाले. पण व्यक्तिगतरित्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणं माझ्यासाठी शक्य नाही. अशी आंदोलनं नवीन असताना मी त्यांचं समर्थन करतो. पण त्याची पाळमूळं मजबूत झाली की, ती आपोआप उभी राहतील असं सोनम वांगचूक म्हणाले. “एक स्वच्छ, पारदर्शक लोकशाहीसाठी जबाबदारी निश्चित करणाऱ्या या आंदोलनात सगळा देश सहभागी होईल” अशी अपेक्षा वांगचूक यांनी व्यक्त केली.

जंतर-मंतरवर 2.0

याआधी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकने पत्रकार परिषद घेतली. निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाला असून नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात आहे असा आरोप दीपके यांनी केला होता. यावेळी पार्टीचे सहसंयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका तिथे उपस्थित होते. ज्ञानेश कुमार यांनी 48 तासात राजीनामा दिला नाही, तर आम्ही दिल्लीत प्रदर्शन सुरु करण्याआधी राष्ट्रव्यापी विरोधी प्रदर्शन करु. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला नाही, तर निश्चितपणे जंतर-मंतरवर 2.0 सुरु होईल असं दीपके म्हणाले. आधी राष्ट्रव्यापी आंदोलन होईल. मग, दिल्लीत अनिश्चितकाळासाठी आंदोलन होईल.

पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं

तीन सदस्यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगात दोन सदस्यांनी SIR प्रक्रियेवर आक्षेप नोंदवणारे अनेक प्रश्न विचारले. सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी या दोन निवडणूक आयुक्तांनी वारंवार आक्षेप नोंदवला. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. या संबंधीचं वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर देशातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us