ढोल-ताशे आणि आकर्षक रोषणाई, नवरीविना थाटामाटात लग्न

अहमदाबाद : आतापर्यंत तुम्ही अनेक लग्नसमारंभ पाहिले असतील, जे हटके पद्धतीने केलेले असतात. लग्न म्हटले तर नवरा-नवरी आलेच, या नवरा-नवरीला आशिर्वाद देण्यासाठी अनेक लोक येतात. मात्र गुजरातमधील एका गावात नवरीविना थाटामाटात लग्न पार पडलं आहे. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल. विशेष म्हणजे या लग्नसमारंभात ढोल-ताशे, आकर्षक रोषणाई, घोड्यावरुन वरात, गोड-धोड जेवण आणि तब्बल 800 …

without bride gujrat, ढोल-ताशे आणि आकर्षक रोषणाई, नवरीविना थाटामाटात लग्न

अहमदाबाद : आतापर्यंत तुम्ही अनेक लग्नसमारंभ पाहिले असतील, जे हटके पद्धतीने केलेले असतात. लग्न म्हटले तर नवरा-नवरी आलेच, या नवरा-नवरीला आशिर्वाद देण्यासाठी अनेक लोक येतात. मात्र गुजरातमधील एका गावात नवरीविना थाटामाटात लग्न पार पडलं आहे. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल. विशेष म्हणजे या लग्नसमारंभात ढोल-ताशे, आकर्षक रोषणाई, घोड्यावरुन वरात, गोड-धोड जेवण आणि तब्बल 800 पाहुणेही आले होते. नवरी नसतानाही हा लग्नसोहळा अगदी आनंदात आणि उत्साहात पार पडला. गुजरातच्या हिम्मतनगरमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय अजय बोरात याचे हे लग्न होते.

अजय बोरात हा गतिमंद असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. अजयला लग्न करण्याची इच्छा होती. पण त्याच्यासारखी नवरी मिळत नव्हती. यामुळे कुटुंबाने नवरीविना लग्न करण्याचा निर्णय घेतला.

“देशात पहिल्यांदाच असं लग्न झालं असावं”, असं तिथल्या गावातील लोक म्हणत होते. एखाद्या लग्नात नवरी नसेल तर लग्न होणं कठीण आहे. पण अजयच्या लग्नासाठी पत्रिका छापण्यात आल्या होत्या. नवऱ्यानेही शेरवानी घालत ढोल-ताशांच्या गजरात घोड्यावर बसून वरात काढण्यात आली. तसेच नवरीविना सर्व विधी परंपराही पार पडल्या.

“लग्नसमारंभात एकूण 800 पाहुणे आले होते. नवरी मिळत नव्हती, पण आम्हाला अजयच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा होता. यासाठी आम्ही सर्व विधी-परंपरासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. नवरीविना लग्न करताना अजयही आनंदी होता. आम्हाला याचा आनंद होत आहे की, नवरीविना लग्न हे केल्यामुळे आम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली आहे”, असं अजयचे वडील विष्णू बरोत म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *