महिलेला मिळालं चुकीचं पार्सल; कंपनी म्हणाली तुमच्याकडेच ठेवा, 10 वर्षांनी उघडलं, आतली वस्तू पाहून बसला जबर हादरा
एका महिलेला चुकीचं पार्सल मिळालं होतं, त्यानंतर कंपनीने हे पार्सल पुन्हा वापस घेण्यास नकार दिला. त्यानंतर ही महिला हे पार्सल विसरून गेली, परंतु जेव्हा तीने दहा वर्षांनंतर हे पार्सल उघडलं तेव्हा, त्यामधील वस्तू पाहून तिला धक्काच बसला.

भारतासह जगभरात आता ऑनलाईन शॉपिंग साईटचं जाळं वेगाने पसरत आहे. प्रत्यक्ष दुकानात जाऊन एखादी वस्तू खरेदी करण्यापेक्षा ग्राहक ती वस्तू थेट ऑनलाईन साईटवरून ऑर्डर करतात. यामुळे दोन फायदे होतात, एक म्हणजे दुकानात जाण्याचा वेळ वाचतो, तसेच दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण एखादी वस्तू जेव्हा ऑनलाईन साईटवरून खरेदी करतो तेव्हा ती वस्तू आपल्याला दुकानातून खरेदी केलेल्या वस्तू पेक्षा तुलनेनं स्वस्त मिळते, आपल्या पैशांची बचत होते. त्यामुळे आजकाल जवळपास सर्वचजण सामानाची ऑनलाईन खरेदी करतात. आता तर ऑनलाईन शॉपिंग साईट्नी अशी देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे, की आपण थेट एखाद्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं असेल तर परस्पर त्याच्या घरी त्याच्या नावाने ते गिफ्ट देखील पाठवू शकतो.
परंतु यामध्ये एक धोका असा देखील आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून वस्तूची खरेदी करता तेव्हा काही वेळेला तुम्हाला चुकीची वस्तू मिळते, किंवा तुमची फसवणूक देखील होऊ शकते. अशावेळी अशी वस्तू संबंधित कंपनीला परत करण्याची प्रक्रिया ही खूप किचकट आणि वेळखाऊ असते. या प्रक्रियेसाठी एखादा आठवडा किंवा महिना देखील लागू शकतो, असाच प्रसंग एका महिलेसोबत घडला आहे. या महिलेनं आपला हा संपूर्ण अनुभव ट्विटरवर पोस्ट केला आहे, सोबतच तीने व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
नेमकं काय घडलं?
या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार तीने एका ऑनलाईन शॉपिंग साईटवरून एक पार्सल मागवलं होतं. परंतु कंपनीने तिला चुकीचं पार्सल दिलं. तेव्हा तिने पुन्हा या कंपनीशी संर्पक साधला, आणि तिने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार या कंपनीला सांगितला. तसेच मला या पार्सलची गरज नाही, तुम्ही तुमचं पार्सल परत घेऊन जा, असंही तिने या कंपनीला सांगितला, तेव्हा कंपनीने तिला सांगितलं की तुम्ही हे पार्सल तुमच्या घरी ठेवू शकता, आम्हाला परत देण्याची गरज नाही. त्यानंतर या महिलेनं हे पार्सल आपल्या घरात ठेवलं आणि ती विसरून गेली.
दहा वर्षानंतर ती एकदा आपल्या घराची साफसफाई करत होती. तेव्हा तीने दहा वर्षांपूर्वी ठेवलेलं ते पार्सल तिच्या नजरेस पडलं ती पूर्णपणे विसरून गेली होती, परंतु त्यानंतर लगेच तिच्या ते लक्षात आलं. तिने उत्सुकता म्हणून हे पार्सल उघडून पाहिलं तर त्यामध्ये गुलाबी रंगाचा एक छान असा सूट होता. महिलेने आपली ही स्टोरी ट्विटवर शेअर केली आहे, हा सूट खूप छान आहे, परंतु आता मला त्याचा काहीही उपयोग नाही, कारण आता तो मला घालता येणार नाही, असं या महिलेनं म्हटलं आहे.