Uttar pradesh : योगींनी घेतली विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहानांच्या कुटुंबियांची भेट, योगींकडून मदत जाहीर

| Updated on: Dec 24, 2021 | 2:53 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांच्या कुटुबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच त्यांच्या कुटुबीयांना 50 लाखांची मदत आणि एका सदस्याला नोकरी देणार असल्याचीही माहिती दिली आहे.

Uttar pradesh : योगींनी घेतली विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहानांच्या कुटुंबियांची भेट, योगींकडून मदत जाहीर
Follow us on

उत्तर प्रदेश : हेलिकॉप्टर अपघात मृत्यू झालेल्या सीडीएस बिपीन राव आणि इतर सैन्यातील अधिकाऱ्यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांचाही अपघात मृत्यू झाला आहे. या अपघात मृत्यू झालेल्यामध्ये इतर राज्यातील लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यांना निरोप देताना संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. देशभरातून यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

योगींनी घेतली कुटुंबियांची भेट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांच्या कुटुबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच त्यांच्या कुटुबीयांना 50 लाखांची मदत आणि एका सदस्याला नोकरी देणार असल्याचीही माहिती दिली आहे. योगी आदित्यनाथ यांनी याबाबत ट्विट केले आहे. तसेच विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांचं एका संस्थेला नाव देण्यात येणार आहे.

13 जणांना दिला आज अखेरचा निरोप

बिपीन रावत यांच्यासह अपघात मृत्यू झालेल्या सर्व 13 जणांना आज शेवटचा निरोप देण्यात आला आहे. यात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांनाही निरोप देण्यात आला आहे. यांना निरोप देताना अनेकांना आश्रू अनावर झाले. रावत यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर त्यांना 17 तोफांची सलामी देऊन गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर मंत्रोच्चारात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी आपल्या मात्यापित्यांना मुखाग्नी दिला. या हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशीही सुरू आहे. त्यामुळे यातून काय माहिती हाती लागतेय? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; एकूण 793 कोटी 86 लाखाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

Mohan Bhagwat: अण्णा भाऊ साठेंप्रमाणेच सावरकरांचं कर्तृत्व, दोघांमध्ये काहीच फरक नाही: मोहन भागवत

Nagpur | पूर्व विदर्भात का व्हावेत वनोपज प्रक्रिया उद्योग? विभागीय आयुक्तांनी सांगितले कारण