
Zomato boy viral video : हिट-अँड-रन अपघातांवरील नवीन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता इतकी झपाट्याने देशभरात पसरली की अनेक ठिकाणी इंधन भरण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दरम्यान फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो बॉयला देखील फटका बसला. या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. कारण एका झोमॅटो बॉयने चांगलाच जुगाड केला होता. त्याने चक्क घोड्यावर फूड डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला होता.
न्यूज एजन्सी IANS नुसार, झोमॅटोची बॅग घातलेला डिलिव्हरी बॉय चंचलगुडा भागातील इम्पीरियल हॉटेलजवळच्या रस्त्यावर घोड्यावर स्वार होताना दिसला. घोड्यावर स्वार होऊन ऑर्डर दिल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
यूजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत. एका युजरने म्हटले की, “मोटारसायकलचे पेट्रोल संपल्यानंतर त्याच्या मनात ही अनोखी कल्पना आली असावी.”
Zomato delivery rider. No petrol, no problem! pic.twitter.com/ZOeUwJ0PVX
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) January 3, 2024
2002 मध्ये मुसळधार पावसात मुंबईत अन्न वितरीत करण्यासाठी घोड्यावर स्वार झालेल्या स्विगी कर्मचाऱ्याच्या दृश्याची आठवण या व्हिडिओने करून दिली.