AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर इंधन तुटवड्यावर पर्याय शोधला, सरकारची सर्वात मोठी घोषणा, आता हा पदार्थही इंधनासाठी वापरात येणार

इराने वाहतुकीसाठी होर्मुज स्ट्रेट बंद केला आहे, त्यामुळे आता जगभरात मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यावर या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोठी बातमी! अखेर इंधन तुटवड्यावर पर्याय शोधला, सरकारची सर्वात मोठी घोषणा, आता हा पदार्थही इंधनासाठी वापरात येणार
Gas cylinderImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 12, 2026 | 8:44 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये यु्द्ध सुरू होऊन आज 13 दिवस झाले आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणाचा मोठा फटका हा भारताला बसत आहे. मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. इराणकडून होर्मुज स्ट्रेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे अनेक कच्च्या तेलाचे जहाज तिथे अडकून पडले आहेत. भारतामध्ये आता गॅस तुटवडा जाणवत असून, गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल चालकांना आपली हॉटेलं बंद ठेवण्याची वेळ आली आहे. दरम्यान त्यानंतर आता देशात इंधनाची नेमकी स्थिती काय आहे? याबाबत केंद्र सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या शर्मा?

भारताला दिवसाकाठी जवळपास 55 लाख बॅरल कच्च्या तेलाची गरज आहे. सध्या तरी कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. भारत हा जागातील सर्वात मोठा चौथा रिफायनरी देश आहे. तसेच देशांतर्गत कच्च्या तेलाचं उत्पादन देखील 28 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती यावेळी शर्मा यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, देशात पेट्रोलियम उत्पादनाची कोणतीही कमी नाहीये. भारताला एका दिवसाला जेवढा नॅचरल गॅस लागतो, त्यातील जवळपास 60 टक्के गरज ही आयातीच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. सध्या गॅसचा पुरवठा देखील सुरळीत सुरू आहे. राज्यांना केंद्राकडून कमर्शियल गॅस सिलिंडर सोबतच 48,000 लीटर रॉकेचा देखील पुरवठा केला जाईल. सोबतच कोळशाचा पुरवठा देखील वाढवण्यात आला आहे. ग्रामीण भागातील लोकांना 45 दिवसांनी सिलिंडर मिळेल, तर शहरी भागातील नागरिकांना दर 25 दिवसांनी एका सिलिडंरचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान शिपिंग मंत्रालयाचे अधिकारी राजेश कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, जहाजांसाठी अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. कट्रोल रूम 24 तास सुरू असणार आहे. भारतीय नाविकांच्या सुरक्षेला भारत सरकार सर्वोच्च प्राथमिकता देत आहे, असं राजेश कुमार यांनी म्हटलं आहे. तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी दुतावास सक्रिय असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार