AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virar News : तंत्र-मंत्राने आजारी मुलाला बरं करण्याच स्वप्न दाखवलं, नंतर विरारच्या रिसॉर्टमध्ये नेऊन मुलाच्या आईसोबत नको ते कृत्य

Virar News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या अंधश्रद्धेचा फायदा उचलत अजय राऊतने तिच्याशी जवळीक वाढवली. महिलेला अर्नाळा येथील एका रिसॉर्टमध्ये बोलवलं.

Virar News : तंत्र-मंत्राने आजारी मुलाला बरं करण्याच स्वप्न दाखवलं, नंतर विरारच्या रिसॉर्टमध्ये नेऊन मुलाच्या आईसोबत नको ते कृत्य
Ajay Raut
| Updated on: Jul 29, 2026 | 11:06 AM
Share

विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन गतिमंद मुलाला बरं करण्याचं स्वप्न दाखवून महिलेवर अत्याचार केला. पीडित महिलेचा मुलगा गतीमंद आहे. तांत्रिकाकडे नेऊन तंत्र-मंत्राने मुलगा बरा होईल असं तिला सांगण्यात आलं. महिलेच्या अंधश्रद्धेचा फायदा उचलून आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. अजय कमलाकर राऊत असं आरोपीचं नाव आहे. आरोपीने महिलेला मुलाला बरं करण्याचा शब्द दिला होता. महिलेच्या अंधश्रद्धेचा फायदा उचलत अजय राऊतने तिच्याशी जवळीक वाढवली. महिलेला अर्नाळा येथील एका रिसॉर्टमध्ये बोलवून तिला शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं. अजयला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. वसई न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

वसई किल्ल्यातील भोंदू बाबा अजय राणाचं नाव या प्रकरणात समोर आलं आहे. त्याच्याकडे नेवून मदत करण्याच्या बहाण्याने पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. अजय राणा हा वसई किल्ला परिसरात मंत्र-तंत्राद्वारे लोकांवर उपचार करतो. त्याच्याकडे आरोपी पीडित महिलेला घेऊन जाणार होता. या अजय राणा भोंदू मांत्रिका विरुद्ध याआधी एका तरुणीला जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

पीडित महिलेची आर्थिक फसवणूक झाली आहे का?

या गुन्ह्यात अजय राणाचा किती सहभाग आहे? पीडित महिलेची आर्थिक फसवणूक झाली आहे का? अशाच प्रकारे अंधश्रद्धेचे जाळे पसरवून आणखी कोणाचे शोषण करण्यात आले आहे का? या अंगाने पोलीस तपास करत आहेत. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 64(1),69, 75, 78 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी सुद्धा असे गुन्हे घडले आहेत. नाशिकच्या अशोक खरातचं प्रकरण सर्वांनाच माहित आहे. त्याने कशाप्रकारे महिलांवर अत्याचार केला. महिलांच्या भाबडेपणाचा फायदा उचलून असे गुन्हे केले जातात.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार