AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : खेळपट्ट्यांबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, आता असं करता येणार नाही

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने एक आदेश दिला आहे. खेळपट्ट्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला गेला आहे.

IPL 2026 : खेळपट्ट्यांबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, आता असं करता येणार नाही
IPL 2026 : खेळपट्ट्यांबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, आता असं करता येणार नाहीImage Credit source: PTI
| Updated on: Mar 12, 2026 | 8:13 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेची पूर्वतयारी झाली असून पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 28 मार्चपासून 12 एप्रिलपर्यंत 20 सामन्यांचं वेळापत्रक समोर आलं आहे. चार राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा अजूनही जाहीर न झाल्याने बीसीसीआयने पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दुसरीकडे दहाही संघ आता तयारीला लागले आहेत. असं असताना या स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने संघांच्या सरावाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेनुसार, संघाला एका संघाने सराव केलेल्या खेळपट्टीवर सराव करता येणार नाही. जर एका संघाने सराव एका खेळपट्टीवर केला असेल, तर दुसऱ्या संघाला दुसऱ्या खेळपट्टीचा वापर करावा लागणार आहे. यासाठी बीसीसीआयने सूचना दिल्या आहेत. बीसीसीआयच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, प्रत्येक संघाला सरावासाठी नवी खेळपट्टी दिली जाईल.

दोन्ही संघांचा एकत्र सराव शिबीर असल्यास किंवा एक संघ दुसऱ्या संघानंतर सराव करणार असेल तेव्हाही एकच खेळपट्टी वापरता येणार नाही. यात थ्रो डाउनचा देखील समावेश आहे. जर एखाद्या संघाने लवकर सराव संपवला तरीही दुसऱ्या संघाला त्यांची खेळपट्टी वापरता येणार नाही. इतकंच काय तर कोणताही संघ मुख्य मैदानावर सराव सामने खेळणार नाही. नव्या पर्वासाठी खेळपट्ट्या तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे मुख्य मैदानावर सराव सत्र किंवा सराव सामने खेळण्याची परवानगी नाही. जर एखाद्या घरच्या फ्रेंचायझीला सराव सामने खेळायचे असतील तर स्टेट क्रिकेट असोसिएशनकडे दुसऱ्या सराव मैदानाची मागणी करू शकतात.

बीसीसीआयने फ्लडलाइट्स सराव सामन्याबाबतही सूचना दिली आहे. सराव सामन्याचा कालावधी साडेतीन तासांपेक्षा अधिक नसावा. इतकंच काय तर संघांना जास्तीत जास्त दोन सराव सामने खेळण्याची परवानगी असणार आहे. पण यासाठीही फ्रेंचायझींना बीसीसीआयकडून परवानगी घ्यावी लागेल. इतकंच काय तर दोन्ही संघांच्या सराव सत्रांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी होम फ्रँचायझीकडे असेल. त्यामुळे आता फ्रेंचायझींना खेळपट्टीचा वापर करताना काळजी घ्यावी लागणार आहे. सराव शिबिरात काही वाद झाल्यास बीसीसीआय यात दखल घेईल.

Follow Us
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ