बेस्ट कंडक्टर ते बेस्ट अॅक्टर

साधारण 1954 किंवा 1955 सालचा किस्सा. एक्झॅक्ट दिवस सांगता येत नाही. पण याच वर्षातला. झालं असं की, एकदा गुरुदत्त आणि चेतन आनंद काहीतरी चर्चा करत बसले होते. अचानक एक दारुड्या तिथे आला. तो दारुच्या नशेत पार बुडाला होता. काहीही बडबडत होता. इकडून तिकडे-तिकडून इकडे त्याचा तोल जात होता. तिथे बसलेल्या गुरुदत्तला तो दारुड्या इसम धक्के […]

बेस्ट कंडक्टर ते बेस्ट अॅक्टर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

साधारण 1954 किंवा 1955 सालचा किस्सा. एक्झॅक्ट दिवस सांगता येत नाही. पण याच वर्षातला. झालं असं की, एकदा गुरुदत्त आणि चेतन आनंद काहीतरी चर्चा करत बसले होते.

अचानक एक दारुड्या तिथे आला. तो दारुच्या नशेत पार बुडाला होता. काहीही बडबडत होता. इकडून तिकडे-तिकडून इकडे त्याचा तोल जात होता. तिथे बसलेल्या गुरुदत्तला तो दारुड्या इसम धक्के देत होता.

या सर्व प्रकाराचा गुरुदत्तला त्रास झाला. त्याने संतापून बाजूला असलेल्या माणसांना बोलावंल आणि म्हटलं, याला आत्ताच्या आता इथून बाहेर घेऊन जा आणि रस्त्यावर फेकून द्या.

हा सगळा प्रकार हाता-पायावर येईल म्हणून तातडीने तिथे बाजूलाच असलेले बलराज सहानी आले आणि त्या दारुड्याचा हात पकडून उभे राहिले. गुरुदत्त बलराज सहानींच्या चेहऱ्याकडे पाहत उभे होते. अर्थात, एकतर हा दारुड्या त्रास देतोय आणि बलराजजी त्याची बाजू घेतल्यासारखे त्याचा हात पकडून उभे होते. कुणी काही बोलायच्या आतच बलराज सहानींनी सांगितलं, हा दारु प्यायला नाहीय. दारुड्याचा अभिनय करतोय.

गुरुदत्तसोबत आजूबाजूला असलेल्या सगळ्यांनाच धक्का बसला. इतका अप्रतिम अभिनय पाहून गुरुदत्त खुश झाले. आणि त्या दारुड्याचं नाव ठेवलं – ‘जॉनी वॉकर’.

जगप्रसिद्ध स्कॉच व्हिस्कीचं ब्रँड असणाऱ्या ‘जॉनी वॉकर’चं नावं ज्या माणसाला गुरुदत्तने दिलं, त्या अभिनयसम्राटाचं मूळ नाव बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी. गुरुदत्तने केवळ बद्रुद्दीनला ‘जॉनी वॉकर’च्या रुपाने नावच दिलं नाही, तर सोबत ‘ओळख’ही दिली.

याचदरम्यान बलराज सहानी ‘बाजी’ची स्क्रीप्ट लिहित होते. गुरुदत्तच्या सांगण्यावरुन जॉनी वॉकरला त्या सिनेमात पहिला रोल मिळाला. आणि ‘बाजी’ जॉनी वॉकरचं हिंदी सिनेसृष्टीतील खऱ्या अर्थाने पदार्पण ठरलं. पुढे गुरुदत्तच्या प्रत्येक सिनेमात जॉनी वॉकर असे. गुरुदत्तने एकूण 8 सिनेमे दिग्दर्शित केले. त्यातील 7 सिनेमांमध्ये जॉनी वॉकर होता. विशेष म्हणजे जॉनी वॉकरवर गाणीही शूट केली जात. ‘प्यासा’मधील ‘सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए’ आणि ‘सीआयडी’मधील ‘ए दिल है मुश्किल जीना यहां.. जरा हटके जरा बचके ये है बॉम्बे मेरी जान’ ही दोन गाणी तर सुपरहिट ठरली. आजही ही गाणी गुणगुणताना जॉनी वॉकरची आठवण येते.

एकंदरीत दारुची एखादी मैफल ‘जॉनी वॉकर’ या व्हिस्कीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तशीच विनोदाची मैफल ‘जॉनी वॉकर’ या अभिनेत्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं त्यावेळी म्हटलं जाई. खास जॉनी वॉकरचा अभिनय पाहण्यासाठी थिएटरच्या पायऱ्या चढणारा एक रसिकवर्ग इथे होता. जॉनी वॉकरने आपल्या हरहुन्नरी अभिनयाने रसिकांच्या एका संपूर्ण पिढीवर आपला अजरामर ठसा उमटवला.

जॉनी वॉकर या अभिनेत्याचं जगणं, त्याचा संघर्ष, त्याचा प्रवास… सारं अफलातून आहे, थक्क करणारं आहे, विस्मयचकीत करणारं आहे.

जॉनी वॉकर यांचा जन्म इंदूरधील. ती एकूण 10 भावंडं. जॉनी वॉकर दुसरे. त्यामुळे वडिलांसारखी घरची जबाबदारी त्यांच्यावर होती. वडील गिरणी कामगार होते. 1942 साली गिरण्या बंद झाल्या आणि घर एकप्रकारे रस्त्यावर आलं. संपूर्ण कुटुंबाने इंदूरहून मुंबई गाठली. मुंबईत ‘बेस्ट’मध्ये कंडक्टर म्हणून जॉनी वॉकर काम करु लागले. 26 रुपये पगार मिळत असे. मात्र अभिनयाचं वेड त्यांना तेव्हाही होतं. बसमध्ये आपल्या अभिनयाने ते प्रवाशांना चढण्यासाठी, उतरण्यासाठी इशारे करत, डायलॉगबाजी करत.

एकदा सिनेमांमध्ये एक्स्ट्रा माणसं पुरवणारा बसमध्ये आला. त्याने जॉनी वॉकरला गर्दीत उभं राहण्याची ऑफर दिली. त्याचे 5 रुपये जॉनी वॉकरला मिळाले. अशाच छोट्या-मोठ्या कामांमधून पुढे बलराज सहानींपर्यंत ते पोहोचले आणि ‘बाजी’ मिळाला. ‘बाजी’नंतर जॉनी वॉकरचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.

तीनशेहून अधिक सिनेमे जॉनी वॉकर यांच्या नावावर आहेत. विसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी शरीर साथ देत नसल्याने त्यांनी सिनेमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही गुलजार आणि कमल हसन यांच्या आग्रहाखातर त्यांनी 1997 साली ‘चाची 420’ सिनेमा केला आणि सिनेसृष्टीला कायमचा राम राम ठोकला.

अभिनयाच्या या व्हिस्कीने 2003 च्या जुलै महिन्यात जगाचा निरोप घेतला. आज जॉनी वॉकर यांचा जन्मदिन. 20-25 वेळा ‘प्यासा’ पाहणाऱ्या माझ्यासारख्याला जॉनी वॉकरची आठवण येणार नाही, असे होईल का?

जॉनी वॉकर, हास्याच्या मैफिलीत नव्याने रंग भरण्यासाठी पुन्हा याच भूमीत जन्म घे…

– नामदेव अंजना, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.