19 वर्षांपूर्वीचा प्रचंड कॉमेडी चित्रपट, थिएटरमध्ये हसून हसून थकले प्रेक्षक, 18 कलाकारांनी केलंय काम

बॉलिवूडमध्ये असे काही कॉमेडी चित्रपट आहेत, ज्यांनी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. असाच एक चित्रपट जो आजही बघताना प्रत्येक प्रेक्षक हसून हसून थकतो.

| Updated on: Feb 22, 2026 | 7:56 AM
1 / 6
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी फक्त बॉक्स ऑफिस तर गाजवलच पण प्रेक्षकांच्या मनावर देखील राज्य केलं. असाच एक चित्रपट ज्यामध्ये 18 कलाकार होते.

2 / 6
2007 साली प्रदर्शित झालेल्या 'वेलकम' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 21 डिसेंबर 2007 रोजी रिलीज झालेल्या या मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बाजमी यांनी केले होते.

3 / 6
‘वेलकम’मध्ये अक्षय कुमार, कॅटरीना कैफ, विजय राज, संजय मिश्रा, नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल, फिरोज खान यांसह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश होता. प्रत्येक कलाकाराने आपल्या खास शैलीत प्रेक्षकांचे मन जिंकले.

4 / 6
‘वेलकम’चे बजेट त्या काळात सुमारे 32 कोटी रुपये होते. चित्रपटाने भारतात 99 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने 119 कोटी रुपयांची कमाई केली. त्या काळात ही कमाई मोठी मानली जात होती.

5 / 6
2015 मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल वेलकम बॅक प्रदर्शित झाला. या भागात नसीरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया यांसारखे नवे कलाकार सहभागी झाले. सुमारे 48 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 167.37 कोटी रुपयांची कमाई केली.

6 / 6
‘वेलकम’ फ्रँचायझीची लोकप्रियता आजही कायम आहे. ‘वेलकम बॅक’नंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगली आहे. कॉमेडी, दमदार संवाद आणि भन्नाट व्यक्तिरेखा यामुळे ‘वेलकम’ ही मालिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली आहे.