पुण्याच्या घटनेवरून ठाकरे गट आकम्रक; सुषमा अंधारेंनी केली मोठी मागणी, थेट मंत्रिमंडळावर परिणाम होणार?
पुण्याच्या घटनेवरून ठाकरे गट आकम्रक झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी मंत्रिमंडळावर परिणाम होणारी मागणी केली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या आवारात मंदार किवळेवर भीषण हल्ला झाला. मंदार किवळेवरील हल्ल्याने पुण्यासहित राज्यात खळबळ उडाली आहे. पुणे, मुंबईतील गुन्हेगारीच्या घटनेवरून विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेवर सत्ताधाऱ्यांना सवाल उपस्थित केले आहेत. पुण्यातील थरारक घटनेवरून सुषमा अंधारे यांनी मोठी मागणी केली. अंधारे यांनी राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा आहे, अशी मागणी अंधारे यांनी केली.
पुण्यातील घटनेवरून सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. अंधारे म्हणाल्या, पुण्यामध्ये गेल्या दोन वर्षात सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे हत्या होत आहेत. कधी कोयता गँगचा धुडगूस, कधी गोळीबार.. हे सर्व पाहता गुंडांना कुणाची भीती उरली नाही का?. असा प्रश्न निर्माण होत आहे.. ह्या लोकांना राजश्रय कोण देतय? पुण्यातील गँगमधील लोकांना सत्ताधारी पक्षातील लोकांनी महापालिकेची तिकिटं दिली’.
‘शहिदांच्या घरी कधी सांत्वनपर भेटीला निलेश राणे पोहोचले नाही. मात्र गुंडाची हत्या झाल्यावर त्याच्या घरी निलेश राणे सांत्वनासाठी पोहोचले. तुम्ही असा राजश्रय देत असाल, तर गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळतं. पुणे पोलिसांनी 145 कोयते जप्त केले होते..तर नवीन कुठून आले?? पुणे पोलीस आयुक्तांचे नक्की चाललय काय? सरकारला आमची विनंती…कृपया आम्हाला पूर्ण वेळचे गृहमंत्री द्या.. आत्ताच्या गृहमंत्र्यांना इतर काम फार आहेत. त्यांना गोकुळमध्ये संचालक नेमायचा आहे. त्यांना पक्ष फोडायचे आहेत. आमदार खासदारांची खरेदी विक्री करायची आहे. हिंदू-मुस्लिम करायचं आहे. कुणाच्यातरी घरी जेवून इव्हेंट करायचे आहेत. या सगळ्यामध्ये कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे’.
अंधारे यांची सुनेत्रा पवार यांच्याकडे मोठी विनंतीं
‘पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना कळकळीची विनंती आहे की, पुण्यातील पोलीस प्रशासनात काही फेरबदल करणे गरजेचे आहेत. पुणे आयुक्त आता बदलले गेले पाहिजेत. अमितेशजी its done bro अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असे अंधारे म्हणाल्या. सुषमा अंधारे यांच्या मागणीनंतर आता पोलीस फेरबदल होणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
