24 तासांत लिहिली 27 गाणी, सगळेच सुपरहिट; एका गाण्याने तर इतिहास घडवला, थेट…

90 च्या दशकातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर असतात. काही गाणी लेखकांनी लिहीलेल्या सुंदर लिरिक्समुळे अजरामर होतात. या गाण्यांना आपल्या शब्दांनी खास ओळख देणारे गीतकार आहेत ज्यांनी एका दिवसात तब्बल २७ गाणी लिहिली. त्यांच्या कामाच्या वेगाबाबतचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे.

| Updated on: Oct 03, 2026 | 7:25 PM
1 / 5
समीर अंजान यांनी एका दिवसात तब्बल 27 गाणी लिहिल्याचे सांगितले आहे. शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी हा अनुभव सांगितला. काम मिळू लागल्यानंतर त्यांच्यावर गाणे लिहिण्याची मोठी जबाबदारी आली.

समीर अंजान यांनी एका दिवसात तब्बल 27 गाणी लिहिल्याचे सांगितले आहे. शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी हा अनुभव सांगितला. काम मिळू लागल्यानंतर त्यांच्यावर गाणे लिहिण्याची मोठी जबाबदारी आली.

2 / 5

समीर अंजान यांनी जवळपास 10-15 वर्षे दिवसातून 3 तासांपेक्षा जास्त झोप घेतली नाही. गाणी लिहिणे हेच त्यांच्या आयुष्याचे मुख्य ध्येय होते. त्यांच्या मेहनतीमुळे त्यांनी मोठी ओळख निर्माण केली.

3 / 5

समीर अंजान यांच्या नावावर सर्वाधिक फिल्मी गाणी लिहिण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 15 डिसेंबर 2015 पर्यंत त्यांनी 3,524 गाणी लिहिली होती. ही गाणी जवळपास 650 चित्रपटांमध्ये होती.

4 / 5

‘आशिकी’मधील ‘नजर के सामने-जिगर के पास’ या गाण्याने त्यांना विशेष ओळख मिळाली. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ अशी गाणीही लोकप्रिय झाली.

5 / 5

समीर अंजान यांनी ‘बेखबर’ चित्रपटातून गीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. ते प्रसिद्ध गीतकार अंजान यांचे पुत्र आहेत. सुरुवातीला त्यांनी बँकेत नोकरी केली, मात्र नंतर गीतलेखनाला करिअर बनवले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us