Old is Gold ! किशोर कुमार यांचा आवाज आणि मंत्रमुग्ध करणारं रोमँटिक गाणं, प्रेमींची आजही पहिली पसंती यालाच… 43 वर्षांनीही सर्वांना आहे पाठ, तुम्ही ऐकलंत का ?

Kishore Kumar Most Romantic Song: 80 आणि 90 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टीतीलएक वेगळाच काळ होता. प्रेम साधेपणानं आणि खरंखुर वाटेल असं शूट व्हायचं. गाण्यांमध्ये दिखावा आणि अनावश्यक झगमगाट नव्हता. केवळ मनापासूनच्या भावना थेट हृदयाला भिडत होत्या. संगीत इतके मनमोहक होतं की, जो कोणी ऐकेल, तो त्यात तल्लीन होऊन जायचा. चला, आज अशाच एका सुंदर, 43 वर्षं जुन्या रोमँटिक गाण्याबद्दल जाणून घेऊया, जे तुम्हालाही आवडत असेलच.

| Updated on: Apr 06, 2026 | 4:22 PM
1 / 5
1970, 80 आणि 90 चं दशक हा असा काळ होता, जेव्हा गाणी ही केवळं वेळ घालवण्यासाठी बनवली जात नव्हती तर प्रत्येक गाण्याचा चित्रपटाच्या कथेशी एक खोल संबंध असायचा. त्या गाण्यांच्या माध्यमातून चित्रपटातील पात्रं ही आपल्या भावना व्यक्त करत असत. प्रेम, वेदना आणि विरहाची भीती, हे सर्व साध्या शब्दांतून, उत्तम गाण्यातून व्यक्त केलं जायचं. विशेषतः किशोर कुमार यांच्या आवाजात एक अनोखा गोडवा आणि करुणा होती, जी लोकांना तेव्हाही आवडली आणि आजही लोकं त्यांच्या आवाजाचे चाहते आहेत.

1970, 80 आणि 90 चं दशक हा असा काळ होता, जेव्हा गाणी ही केवळं वेळ घालवण्यासाठी बनवली जात नव्हती तर प्रत्येक गाण्याचा चित्रपटाच्या कथेशी एक खोल संबंध असायचा. त्या गाण्यांच्या माध्यमातून चित्रपटातील पात्रं ही आपल्या भावना व्यक्त करत असत. प्रेम, वेदना आणि विरहाची भीती, हे सर्व साध्या शब्दांतून, उत्तम गाण्यातून व्यक्त केलं जायचं. विशेषतः किशोर कुमार यांच्या आवाजात एक अनोखा गोडवा आणि करुणा होती, जी लोकांना तेव्हाही आवडली आणि आजही लोकं त्यांच्या आवाजाचे चाहते आहेत.

2 / 5

खरं तर, आज आपण ज्या 43 वर्षापूर्वीच्या रोमँटिक गाण्याबद्दल बोलतोय, ते आजही अनेक प्रेमवीरांच्या ओठावर असतं, अनेक जण हे गाणं आवडीने गुणगुणत असतात. हे गाणं किशोर कुमार यांच्या सदाबहार गाण्यांपैकी एक आहे. किशोर कुमार यांनी राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांच्यासह अनेक कलाकारांना आपला आवाज दिला आहे. पण हे गाणं त्यांनी एका 23 वर्षाच्या नायकासाठी गायलं, ते एवढ हिट झालं की सर्वांचं मन या गाण्याने जिंकलं.

3 / 5

ज्या गाण्याबद्दल आपण आज बोलतोय, ते म्हणजे सदबाहर गाणं, 'नीले नीले अंबरपे चांद जब आए'. 1983 सालच्या 'कलाकार' या चित्रपटातील गाण्यात श्रीदेवी देखील आहे. तिच्या अभिनयाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले. या अतिशय मोहक आणि सुंदर अशा गाण्याला किशोर कुमार यांनी आवाज दिला होता. इंदीवर आणि मनोज कुमार यांनी हे गीत लिहीलं तर कल्याणजी आनंदजी यांचं अवीट गोडीचं संगीत होतं. 3 मिनिटे 54 सेकंदांच्या या गाण्याने सर्वांना मोहित केले होते.

4 / 5

या रोमँटिक गाण्याबद्दल बोलायचं झालं तर, याच्या व्हिडिओमध्ये मुख्य अभिनेता कुणाल गोस्वामी आणि अभिनेत्री श्रीदेवी साध्या पद्धतीने रोमान्स करताना दिसतात. हे गाणे एका सुंदर ठिकाणी, निळं आकाश, मोकळी हवा आणि मंद वाऱ्याची झुळूक, अशा वातावरणात शूट करण्यात आलं होतं. एकूणच, ते खूप रोमँटिक वातावरण होतं, अगदी आजच्या प्रेमींना आवडेल असंही. असतं तसंच. या गाण्याचे व्हिजुअल्स पाहून कोणीही मंत्रमुग्ध होईल.

5 / 5

'नीले नीले अंबर पर' या सुपरहिट गाण्यात प्रेम खूप साधं आणि नैसर्गिक असल्याचं दाखवंत. यात कोणताही भडक, झगमगा किंवा भव्य सेट नाही; केवळ संगीतच आपल्या हृदयाला स्पर्श करतं आणि त्यामुळेच हे गाणं पुन्हा पु्न्हा ऐकावसं वाटतं. म्हणूनच हे गाणे प्रेमी जोडप्यांपासून ते आजच्या तरुण पिढीलाही तसेच थोरा-मोठ्यांनाही ऐकायला आवडतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us