एकाच घरामध्ये आढळली तब्बल 40 नागांची पिल्ले, दोन मोठे विषारी नाग; घाबरगुंडी उडवणारी महाराष्ट्रात कुठे घडली?

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे तर, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत. अनेकांच्या घरात, दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पण एका घरात तर, तब्बल 40 नागांची पिल्ले आणि दोन विषारी नाग घुसलवे आहेत. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

| Updated on: Jul 05, 2026 | 12:06 PM
1 / 5
साप, नाग यांचा विषय जरी काढला तरी भीती वाटते. कारण विषारी सापांनी चावा घेण्यामुळे मृत्यू हा निश्चित असतो. आता पावसाळा सुरु झाल्यामुळे सापांचा वावर वाढला आहे. मानवीवस्तीत साप दिसत आहेत. आता तर एका घरात ब्बल 40 नागांची पिल्ले आणि दोन विषारी नाग घुसलवे आहेत. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

साप, नाग यांचा विषय जरी काढला तरी भीती वाटते. कारण विषारी सापांनी चावा घेण्यामुळे मृत्यू हा निश्चित असतो. आता पावसाळा सुरु झाल्यामुळे सापांचा वावर वाढला आहे. मानवीवस्तीत साप दिसत आहेत. आता तर एका घरात ब्बल 40 नागांची पिल्ले आणि दोन विषारी नाग घुसलवे आहेत. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

2 / 5

नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळच्या नेरला गावात राजू ढोमने यांच्या घरामध्ये तब्बल 40 नागांची पिल्ले आणि दोन मोठे विषारी नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.

3 / 5

घटनेची माहिती मिळताच चाचेर येथील वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र रतन कुंभरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने त्यांनी सर्व 40 नागांची पिल्ले कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडली.

4 / 5

वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करत या सर्व पिल्लांना रामटेक वन विभागाच्या कार्यालयात आणून नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील जंगलात सुखरूप सोडण्यात आले. संपूर्ण घटना अत्यंत भयानक होती. सुदैवाने कोणती दुर्घटना घडली नाही.

5 / 5

घटना समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी, घराच्या परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता त्यांना मारण्याचा प्रयत्न व पकडण्याच्या प्रयत्न करू नये, परिसरात साप आढळल्यास त्वरित जवळच्या अनुभवी सर्पमित्रांना किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us