4 हजार कोटींचे कर्ज, मृत्यूनंतर उभे राहिले आलिशान साम्राज्य, थक्क करेल या स्टारची कहाणी!
आज आम्ही तुम्हाला एका अशा स्टारची कहाणी सांगणार आहोत ज्याने एकेकाळी संपूर्ण जगावर राज्य केले होते. पण या झगमगाटाच्या दुनियेमागे काळे सत्य दडले होते. या स्टारवर 4 हजार कोटींचे कर्ज झाले होते. पण जेव्हा या स्टारचे निधन झाले तेव्हा कुटुंबीयांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली.

कलाकार हे रातोरात स्टार होतात. जितक्या वेगाने त्यांची कमाई वाढते तिताच त्यांचा खर्च देखील वाढत जातो. लग्झरी आयुष्य जगण्यासाठी ते कोट्यवधी रुपये खर्च करतात. मोठी घरे आणि महागड्या प्रवासावर प्रचंड पैसा खर्च झाला. दागिने, आर्ट कलेक्शन आणि विविध प्रकारच्या प्राण्यांवरही मोठी रक्कम खर्च करण्यात आली. यासोबतच दानधर्म, सतत चालणारे कायदेशीर खटले आणि व्यवस्थापनाचा खर्चही वाढत राहिला. हळूहळू परिस्थिती अशी झाली की कर्जाचा डोंगर वाढतच गेला. मात्र, मृत्यूनंतर त्याच नावाने आणि कामाने एका मोठ्या व्यवसायाचे रूप घेतले आणि इथूनच कथेला नवे वळण मिळाले.

होय, आपण इथे दुसऱ्या कोणाबद्दल नाही तर 'किंग ऑफ पॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माइकल जॅक्सन यांच्याबद्दल बोलत आहोत. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या इस्टेटने (मालमत्तेने) कमाईचा नवा मार्ग शोधला. त्याच्या अपूर्ण राहिलेल्या कॉन्सर्ट रिहर्सलवर आधारित ‘This Is It’ या डॉक्युमेंटरीने जगभरात सुमारे २६५ मिलियन डॉलरची कमाई केली. याशिवाय त्याच्या जुन्या गाण्यांच्या, अल्बमच्या आणि मर्चेंडाईजच्या विक्रीतून सुमारे १०० मिलियन डॉलर मिळाले. या पैशातून हळूहळू त्याचे कर्ज फेडले गेले. काळानुसार त्याच्या नावाशी संबंधित प्रत्येक नवीन प्रकल्प पैसे मिळवून देऊ लागला आणि इस्टेटची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम झाली.

माइकल जॅक्सनकडे एकेकाळी ATV Music Publishing सारखा मोठा म्युझिक कॅटलॉग होता, ज्यामध्ये 'द बीटल्स'च्या अनेक प्रसिद्ध गाण्यांचे हक्क समाविष्ट होते. नंतर त्याने हा कॅटलॉग सोनी (Sony) कंपनीला सुमारे 750 मिलियन डॉलरमध्ये विकला. याशिवाय त्याच्या स्वतःच्या गाण्यांच्या हक्कांतूनही मोठी कमाई झाली. या सर्व करारांमुळे आणि कमाईमुळे त्यांच्या इस्टेटचे एकूण मूल्य वाढून सुमारे 3.5 बिलियन डॉलर (अंदाजे २९,००० कोटी रुपये) झाले आहे. आजही त्यांची कमाई सतत वाढत आहे.

अलीकडेच त्यांच्या जीवनावर आधारित ‘माइकल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये त्यांचा पुतण्या जाफर जॅक्सन याने त्यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली असून प्रेक्षकांनीही त्याला पसंती दिली आहे. हा चित्रपट आल्यानंतर त्यांची जुनी गाणी पुन्हा एकदा सोशल मीडिया आणि म्युझिक प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करू लागली आहेत. यापूर्वी जेव्हा 'बोहेमियन रॅप्सोडी' सारखा चित्रपट आला होता, तेव्हाही संगीताच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळाली होती. आगामी काळात असे आणखी प्रकल्प येतील, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता आणि ब्रँड व्हॅल्यू अधिक मजबूत होईल, असे मानले जात आहे.

माइकल जॅक्सन यांचा जन्म 29 ऑगस्ट १९५८ रोजी गॅरी, इंडियाना येथे झाला होता. ९ भावंडांमध्ये ते ७ व्या क्रमांकाचे अपत्य होते. त्यांनी अत्यंत लहान वयात आपल्या भावांसोबत 'The Jackson 5' च्या माध्यमातून करिअरला सुरुवात केली. लहानपणापासूनच त्यांच्या गायन आणि नृत्याने लोकांना प्रभावित केले. नंतर सोलो आर्टिस्ट म्हणून त्यांनी Thriller, Billie Jean आणि Beat It सारखी अनेक हिट गाणी दिली. सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पॉप संगीताला नवी ओळख दिली. २५ जून २००९ रोजी लॉस एंजेलिसमध्ये त्यांचे निधन झाले, पण त्यांचे नाव आजही अजरामर आहे.