हिटलरच्या अशा 5 खाजगी वस्तू,ज्यांना लिलावात खरेदी करण्यासाठी लोकांनी करोडो रुपये मोजले

जर्मनीचा हुकुमशहा एडोल्फ हिटलर याचे नाव जगातील सर्वाधिक क्रुर शासकात घेतले जाते. हिटलरने आपल्या देशासह जगालाही संकटात टाकले. त्याच्या निर्णयाने जगाला दुसरे महायुद्धात ढकलले गेले.हिटलरच्या अनेक वस्तूंना प्रचंड मागणी आहे. लिलावात या खाजगी वस्तूंना विकत घेण्यासाठी लाखोंची बोली लावली गेली. पाहा कोणत्या त्या खाजगी वस्तू आहेत,ज्याच्यावर हिटलरचा प्रचंड जीव होता...

| Updated on: Mar 31, 2025 | 8:48 PM
1 / 5
 हिटलरला पेंटिंग्स काढण्याचा छंद होता. त्याने जर्मनीत त्याकाळात बिटले कारचे डिझाईन देखील केले होते. त्याच्या लिलावात चित्रांना खूपच भाव मिळाला. हिटलरने चितारलेल्या पेंटिंग्सना  66 कोटी  रुपयांहूनही अधिकची बोली लावून  खरेदी केले गेले.

2 / 5
 हिटलरच्या अनेक वस्तूंचा अमेरिकेत लिलाव केला गेला.या लिलावात त्याच्या घड्याळास 9 कोटी रुपयांची बोली लागून ते घड्याळ विक्रीस गेले आहे. या घड्याळात नाझींचे चिन्ह देखील आहे..आणि त्यावर AH लिहीलेले आहे. AH चा अर्थ एडोल्फ हिटलर असा आहे.

3 / 5
 हिटलरच्या  एका लाल रंगाच्या टेलीफोनचा देखील लिलावात सौदा झाला. या फोनवर देखील हिटलरचे नाव आणि नाझी चिन्ह आहे. याच फोनचा वापर हिटलरने युद्धा दरम्यान सैन्याला आदेश देण्यासाठी त्याने केला होता असे म्हणतात.यास दोन कोटीहून अधिक रकमेची बोली लागली होती.

4 / 5
एका अमेरिकन सैनिकाने दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात त्याच्या बाथरुममधून त्याचा कमोड आठवण म्हणून सोबत नेला होता. त्याने अनेक वर्षे हा कमोड घरी ठेवला. त्यानंतर या कमोडचा लिलाव झाला तेव्हा त्यास १३ लाखाहून अधिक रुपयांना खरेरी केले गेले.

5 / 5
या लिलावादरम्यान हिटलरचे केस देखील विकले गेले. हे केस हिटलरच्या हेअर ब्रशमधून काढले होते. या केसांना तब्बल 1.7 कोटींची बोली लागून त्याचा लिलाव लागला होता.