विषारी औषधामुळे शेततळ्यातील पाच टन माशांचा मृत्यू

| Updated on: Aug 10, 2021 | 12:53 PM

Fish| सध्या या माशांचे वजन 500 ते 700 ग्रॅम झाले होते, मात्र रात्री अचानक अज्ञात इसमाने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले.

1 / 5
इंदापूर तालुक्यातील पळसदेव नजीक असलेल्या शेलारपट्टा परिसरातील अशोक केवटे यांच्या शेततळ्यातील पाच टन मासे अचानक मृत्युमुखी पडले आहेत.

2 / 5
रूपचंद जातीचे हे मासे अज्ञात इसमाने विषारी औषध पाण्यात टाकून मारल्याचा संशय असून या शेतकऱ्याने इंदापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे.

3 / 5
केवटे यांनी त्यांच्या शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी रूपचंद जातीचे तीस हजार बीज सोडले होते.

4 / 5
सध्या या माशांचे वजन 500 ते 700 ग्रॅम झाले होते, मात्र रात्री अचानक अज्ञात इसमाने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले.

5 / 5
मासे मेल्यामुळे शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.