बाहेर 100 रुपयांना मिळणारी वस्तू डी मार्टमध्ये फक्त 50 रुपयांना, सर्वात मोठं डिस्काऊंट
जर तुम्हीही सवलतीच्या दरामध्ये घरगुती सामान खरेदी करणारे असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत कामाची आहे. सध्या डी-मार्ट एका वस्तूवर तब्बल 50 टक्के सूट देत आहे. कोणती आहे ही वस्तू?

डी-मार्ट हा सर्वसामान्य लोकांसाठी मोठी सूट घेऊन येणारा पर्याय म्हणून बाजारात प्रचलित आहे. अनेकदा महिन्याचा किराणा असेल किंवा इतर काहीही खरेदी करायचे असल्यास सामान्य जनता एकदा डी-मार्टमधील रेट तपासून पाहतात आणि नंतरच त्यांचा निर्णय घेतात.
दरम्यान, अनेक वस्तूंवर भरघोस डिस्काऊंटच्या अपेक्षेमध्ये असणाऱ्या ग्राहकांसाठी आता आणखी एका वस्तूवर ५० टक्के सूट मिळत आहे.
तर ही वस्तू नेमकी कोणती असाही प्रश्न तुम्हा पडला असेल. तर ही एक जीना कोलाची बॉटल आहे. या बाटलीवर तब्बल ५० रुपयांची सूट देण्यात आली आहे. ही बॉटल २.२५ लिटरची असून तिची MRP १०० रुपये दाखवत आहे. पण ग्राहकांसाठी डी-मार्टने ती ५० टक्के सवलतीत उपलब्ध करुन दिली आहे.
त्यामुळे तुम्हीही जर कोका कोला, थम्सअप आणि कोल्ड ड्रींक प्रेमी असालं तर या सवलतीचा फायदा तुम्हाला घेता येईल. याशिवाय इतरही वस्तुंचे दर तपासता येतील.
यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करु शकता. त्यासाठी संबंधित साईटवर जाऊन इतरही वस्तु आणि पेयांचे दर तुम्ही तपासू शकता.