60 लाखांचे होम लोन घ्यायचंय, मग किती पगार हवा? हफ्ता किती असणार? जाणून घ्या A टू Z माहिती

एचडीएफसी बँकेच्या ७.९०% व्याजदराने ६० लाखांचे गृहकर्ज कसे मिळवायचे, त्यासाठी पगार किती हवा आणि ईएमआयचे सोपे गणित काय आहे, याची सविस्तर माहिती येथे वाचा.

| Updated on: Jan 02, 2026 | 3:55 PM
1 / 8
आपले स्वत:चे हक्काचे घर असावे, असे अनेक मध्यमवर्गीयांचे स्वप्न असते. आता घर घेण्याचे हे स्वप्न मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येत आहे. देशातील आघाडीची खाजगी बँक एचडीएफसी (HDFC) सध्या ७.९० टक्के या आकर्षक व्याजदराने गृहकर्ज देत आहे.

2 / 8
जर तुम्हाला ६० लाख रुपयांचे गृहकर्ज घ्यायचे असेल आणि तुम्ही त्याचे नियोजन करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. ६० लाखांचे कर्ज फेडण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी हा सर्वात सोयीचा मानला जातो. कारण यामुळे दरमहा खिशावर पडणारा भार कमी होतो.

3 / 8
७.९० टक्के व्याजदराप्रमाणे या कर्जाचा मासिक हप्ता (EMI) साधारण ४४,००० रुपयांच्या आसपास येतो.  बँकेच्या नियमानुसार यासाठी तुमचा मासिक पगार किमान ८८,००० रुपये असणे गरजेचे आहे.

4 / 8
याचे साधे गणित असे की, तुमच्या हातात येणाऱ्या पगारातील निम्मी ५० टक्के रक्कम घरखर्चासाठी आणि उरलेली निम्मी रक्कम कर्जाच्या हप्त्यासाठी वापरली जाऊ शकते, असे बँक गृहीत धरते. जर तुमचा पगार ८८,००० पेक्षा कमी असेल, तर बँक तुम्हाला ६० लाखांऐवजी थोडे कमी कर्ज देऊ शकते.

5 / 8
तसेच, तुमचा क्रेडिट स्कोअर (CIBIL Score) ७५० च्या वर असेल, तर तुम्हाला सर्वात कमी व्याजदराचा फायदा मिळतो. पण लक्षात ठेवा, जर तुमचे आधीच एखादे पर्सनल लोन किंवा कार लोन सुरू असेल, तर तुमची कर्ज मिळण्याची क्षमता कमी होऊ शकते.

6 / 8
रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात केल्यामुळे सध्या गृहकर्ज स्वस्त झाले आहे. गृहकर्ज घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की, जेवढा जास्त कालावधी तुम्ही निवडाल, तेवढा तुमचा मासिक हप्ता कमी असेल, पण बँकेला परत द्यावे लागणारे एकूण व्याज मात्र जास्त असेल.

7 / 8
जर तुमचा पगार कमी असेल आणि तुम्हाला ६० लाखांचेच कर्ज हवे असेल, तर तुम्ही कुटुंबातील इतर कमावत्या व्यक्तीला (उदा. पती/पत्नी) सह-अर्जदार म्हणून जोडू शकता, ज्यामुळे दोघांचा पगार मिळून तुम्हाला मोठ्या रकमेचे कर्ज सहज मिळू शकेल.

8 / 8
तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर खरेदी करण्यासाठी केवळ इच्छाशक्ती असून चालत नाही, तर त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन, उत्पन्नाचा खात्रीशीर स्रोत आणि बँकेच्या नियमानुसार आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर कागदपत्रांची अचूक पूर्तता करणे हाच तुमच्या यशाचा खरा आणि सोपा मार्ग आहे.