
कोल्हापूरमध्ये भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची तरुणांकडून थट्टा केल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जल्लोष केला आहे.

चंद्रकांत पाटलांप्रमाणे दिसणाऱ्या तरुणाला कारवर बसवून हिमालयात चालल्याचे पोस्टर दाखवत काढली रॅली

मी हिमालयात चाललो, असा आशयाचा तरूणांच्या हातात बॅनर आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नेते कोल्हापूरात प्रचारासाठी आल्याने निवडणुकीची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. अवघ्या महाराष्ट्राचं कोल्हापूरच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं होत.

त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा मोठ्या फरकाने पराजय केला.