
कोरोना विषाणू संक्रमणादरम्यान स्पेनमध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही आठवड्यांपूर्वीपर्यंत हे रैपर कोण आहेत हे लोकांना माहीत नव्हतं.

स्पेनमध्ये तुरूंगात डांबल्या गेलेल्या रॅपरवर आरोप आहेत की त्यानं गाण्याच्या माध्यमातून दहशतवादाला समर्थन दिलं आणि राजघराण्याचा अपमान केला.

32 वर्षीय पाब्लो हेजलला काही आठवड्यांपूर्वीपर्यंत कोणीही ओळखत नव्हतं. मात्र आता त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी देशभरात निदर्शनं होत आहेत.

हा लेफटिस्ट रॅपर आहे, पाब्लोला अनेक लोक कवी मानतात, मात्र काहींच्या दृष्टीनं तो एक गुंडा आहे. तो कॅटालोनियाचा समर्थक आहे.

पूर्वी पाब्लोवर लोकांवर प्राणघातक हल्ला आणि कायदा तोडल्याचा आरोपदेखील केला होता. आता त्यांनी ट्विट आणि गाण्यांच्या माध्यमातून माजी किंग जुआन कार्लोस प्रथम यांच्यावर टीका केली.

दहशतवादाला समर्थन देण्याच्या आरोपाखाली त्याला नऊ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपल्या गाण्यांमध्ये त्यांनी राजाला माफिया असे वर्णन केले आहे.

बर्याच शहरांमध्ये पाब्लोच्या सुटकेसाठी डाव्या विचारसरणीचे गट जाळपोळ करत आहेत.

एवढंच नाही तर एका टीव्ही चॅनलच्या कार्यालयावर आणि नेत्यांवरही पाब्लोने बॉम्ब फेकण्याविषयीची चर्चा आहे.

(फोटो : PTI)