
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका अंतर्गत येत असलेल्या लाहेरी परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप नाहक त्रास सहन करावा लागतो.

कारण गुंडेनुर नाल्यावर पूल नसल्यामुळं पावसाळ्याच्या दिवसात लाहेरी हा संपर्काच्या बाहेर असतो. यावर्षीही या परिसरातील नागरिकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागला.

आता पावसाने विश्रांती घेतली असून पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे आदिवासी बांधवांनी गुंडेनून नाल्यावर श्रमदानातून लाकडाचा पूल उभारला आहे.

या नाल्यावर पूल मंजूर असून याचे कार्य अजून पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे गावकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून हा पूल बांधला आहे. या नाल्यामुळे पावसाळ्यात सात ते आठ गावांचा संपर्क तुटतो. काही काळाकरिता का होईना परंतु पायवाट व दुचाकीस्वारांसाठी गावकऱ्यांनी श्रमदानातून हा पूल बांधून पर्यायी व्यवस्था केली आहे.