AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन ठिकाणी कधीही राग करू नका, होईल मोठं नुकसान, चाणक्य काय सांगतात?

चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाचा रागा सारखा दुसरा मोठा शत्रू कोणताही नाही, जेव्हा एखाद्या व्यक्तीला राग येतो, तेव्हा तो आपल्याच हातानं आपलं नुकसान करण्याची शक्यता असते. त्यामुळे परिस्थिती कशीही असो राग न करण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

Chanakya Niti : या तीन ठिकाणी कधीही राग करू नका, होईल मोठं नुकसान, चाणक्य काय सांगतात?
CHANKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 14, 2026 | 8:03 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. कारण तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा, व्यक्तीचा राग येतो, तेव्हा तुम्ही त्या क्षणाला काय करता? हे तुम्हाला देखील कळत नाही. रागाच्या भरात तुमच्याकडून काही वेळेला मोठी चूक होते, मात्र नंतर वेळ निघून गेलेली असते. त्यावेळी पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीही उरत नाही. त्यामुळे अशा गोष्टी टाळण्यासाठी माणसानं आपल्या रागावर नियंत्रण मिळवायला शिकलं पाहिजे. संयम हा माणसाकडे असलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे. जर तुमच्याकडे संयम नावाचं शस्त्र असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकू शकतात. मात्र जर तुमच्याकडे संयम नसेल आणि तुम्हाला थोड्या -थोड्या गोष्टींवरून राग येत असेल तर तुमचं भविष्यात फार मोठं नुकसान होऊ शकतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य म्हणतात असे काही ठिकाणं असतात, अशा काही गोष्टी असतात जिथे राग न करता शांततेत निर्णय घेणं अपेक्षित असतं. त्यामुळे तुमचं भविष्यातील नुकसान टळतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

बोलताना राग टाळा – चाणक्य म्हणतात तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर बोलत असाल आणि त्याचवेळी तुम्हाला त्या व्यक्तीचा राग आला तर तो लगेच व्यक्त करू नका. त्यावर नियंत्रण मिळवायला शिका. कारण अशा वेळी तुम्ही जर राग व्यक्त केला तर, तुमचं जे काम होणार आहे, ते काम देखील होतं नाही. समोरचा व्यक्ती दुखावला जातो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवायाला शिकलं पाहिजे, त्यातच तुमचं हीत आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

निर्णय घेताना – चाणक्य म्हणतात तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणताही महत्त्वाचा निर्णय रागाच्या भरता कधीही घेऊ नका. कारण जे निर्णय हे रागाच्या भरात घेतले जातात, त्यातील जवळपास 99 टक्के निर्णय हे चुकतात. भविष्यात या निर्णयांची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते, त्यामुळे कधीही रागाच्या भरता कोणताही निर्णय घेऊ नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

लहान मुलं आणि कमजोर व्यक्ती – जेव्हा तुम्ही लहान मुलं किंवा एखादा व्यक्ती जो तुमच्यापेक्षा दुर्बल असेल,अशा व्यक्तींसोबत बोलत आहात, तेव्हा कधीही राग व्यक्त करू नका. जर तुम्ही तुमच्या मुलांसोबत बोलताना राग व्यक्त करत असाल तर त्याचा परिणाम हा तुमच्या मुलांवर होतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?