AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा…

Anna Hajare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावर अण्णा हजारे यांनी टीका केली आहे.

6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा...
Anna Hajare on 6 MPImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 22, 2026 | 7:56 PM
Share

राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पक्षांतरावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अण्णा हजारेंची खासदारांवर टीका

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत, याबाबत प्रश्न विचारला असता अण्णा हजारे यांनी म्हटले की, अशा पद्धतीने पक्ष बदल करणे योग्य नाही. श्रद्धा, निष्ठा आणि ध्येयवाद नसल्यामुळेच दल बदल होतो. समाजासाठी काम करण्याची भूमिका असलेले नेते पक्ष बदलत नाहीत. स्वतःचे हित साधण्यासाठीच अनेकजण पक्षांतर करतात, असा आरोपही हजारे यांनी केला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

6 खासदारांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘शिवसेना हे कुटुंब आहे. परिवार आहे. खऱ्या शिवसेना परिवारात, बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेना परिवारात कट्टर शिवसैनिक खासदार सामील झाले आहेत. त्यांचं मी पक्षात स्वागत करतो. चार वर्षापूर्वी 22 जून 2022 रोजी शिवसेनेने आम्ही उठाव केला होता. तेव्हा 40 आमदार सुरुवातीला आले. त्यानंतर पुन्हा चौकार नाही, षटकार मारलेला आहे. सिक्सर. अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला. हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आपला लढा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. हिंदुत्वाच्या विचाराचा आहे.’

एकनाश शिंदे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘शिवसेनेचा विचार तिथे शिवसैनिक. म्हणून या सहा खासदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत, खऱ्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. काही लोकं मीडियावर काही उलट सुलट चुकीच्या बातम्या आरोप प्रत्यारोप करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो, मी सर्वांचा मान सन्मान राखेल, तुमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवेल, आपण कुटुंब म्हणून पुढची वाटचाल करू.’

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!