AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ममता बॅनर्जींच्या हातून तृणमूल निसटला; बंडखोर गटाचा सर्वात मोठा धक्का, अध्यक्षपदावरून हटवलं, नव्या अध्यक्षाची घोषणा

तृणमूल काँग्रेसमधून मोठी बातमी समोर येत आहे, बंडखोर गटाकडून ममता बॅनर्जी यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे, तर अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

मोठी बातमी! ममता बॅनर्जींच्या हातून तृणमूल निसटला; बंडखोर गटाचा सर्वात मोठा धक्का, अध्यक्षपदावरून हटवलं, नव्या अध्यक्षाची घोषणा
Mamata BanerjeeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 22, 2026 | 8:08 PM
Share

तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृखालील बंडखोर आमदाराच्या गटाने ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवलं आहे. तर अभिषेक बॅनर्जी यांना थेट पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. बंडखोर आमदाराच्या गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आपणच खरी तृणमूल असल्याचा दावा या बंडखोर आमदारांच्या गटाकडून करण्यात आला आहे, त्यानंतर या बंडखोर गटाकडून संघटनात्मक समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे, संघटनात्मक समितीची स्थापना करताच बंडखोर आमदाराच्या गटाने मोठी घोषणा केली आहे, त्यांनी ममता बॅनर्जी यांना पार्टीच्या अध्यक्षपदावरून हटवलं असून, अभिषेक बॅनर्जी यांना तर थेट पक्षातून निलंबित करण्यात आल्याचा ठराव मंजूर केला आहे.

बंडखोर गटाचे ज्येष्ठ आमदार अरूप रॉय यांची नव्याने स्थापन झालेल्या संघटनात्मक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यू टाऊनमधील एका हॉटेलमध्ये या बंडखोर आमदारांची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये हे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.विशेष म्हणजे या बैठकीला कोलकाता महापालिकेसह तीन जिल्ह्यांमधील 70 नगरसेवकांची देखील उपस्थित होती. या बैठकीमध्ये ममता बॅनर्जी यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं असून, त्यांच्या जागी आता अध्यक्ष म्हणून अरूप रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरूप रॉय हे हावडा सेंट्रल मतदारसंघाचे आमदार आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. आधी आमदार फुटले, त्यानंतर खासदार फुटले आता तर ममता बॅनर्जी यांना थेट अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे. तसेच अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे, त्यांच्याऐवजी अध्यक्ष म्हणून अरूप रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला