Aamir Khan on Marriage: वयाच्या 61व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करण्यावर आमिर खानने सोडले मौन, म्हणाला…
Aamir Khan on Marriage: काल पासून बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. आता आमिरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा नवरदेव होणार आहे. वयाच्या 61व्या वर्षी अभिनेता गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न करणार आहे. कालपासून आमिरच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरु आहे. आता खुद्द मिस्टर परफेक्शनिस्टने आपल्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केला आहे. अभिनेत्याने आपल्या लग्नाच्या तारखेसोबतच हेही सांगितले की, त्याने आधीच मनापासून गौरीशी लग्न केले आहे.

बॉलिवूड सुपरस्टारने 'व्हरायटी इंडिया'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, तो गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्न करण्याचे प्लॅनिंग करत आहे. त्याने सांगितले की, तो सध्या अमेरिकेत आहे आणि दोघेही ५ जुलै रोजी मुंबईत लग्नबंधनात अडकणार आहेत.

आमिर खान म्हणाला, "मी सध्या अमेरिकेत आहे. लग्नाची बातमी खरी आहे. ते ५ जुलै रोजी आहे." आमिरने पुढे म्हणाला की, "आता आम्ही दोघेही आमचे नाते पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी तयार आहोत."

आमिरने पुढे सांगितले की, तो आणि गौरी एकमेकांबद्दल खूप सीरियस आहेत आणि एकत्र राहतही आहेत. तो म्हणाला, "मी पूर्णपणे समाधानी आहे. गौरी आणि मी एकमेकांबद्दल सीरियस आहोत आणि आमचे नाते खूप मजबूत आहे. आम्ही जोडीदार (पार्टनर्स) आहोत, आम्ही एकत्र आहोत. मनाने तर मी आधीच तिच्याशी लग्न केले आहे. त्यामुळे, आमच्या नात्याला अधिकृत स्वरूप देणे हे आमच्या भागीदारीचे एक नैसर्गिक पाऊल वाटते."

आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत पहिले लग्न केले होते. मात्र, २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने किरण रावसोबत दुसरे लग्न केले होते. २०२१ मध्ये ते दोघेही वेगळे झाले. किरणसोबतच्या घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर आमिर आणि गौरी रिलेशनशिपमध्ये आहेत.