
बिग बॉस 17 च्या घरात मोठा हंगामा बघायला मिळतोय. फिनाले वीक सुरू झालाय. नुकताच बिग बॉस 17 च्या घरातून ईशा मालवीय ही बेघर झालीये.

ईशा मालवीय ही बिग बॉस 17 मधून बाहेर पडल्यानंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमार हा ढसाढसा रडताना दिसला. याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

ईशा ही अभिषेकला जाताना साॅरी बोलताना देखील दिसत आहे. हेच नाही तर ईशा मालवीय गेल्यानंतर अभिषेक स्वत: ला रडण्यापासून रोखू शकला नाही.

बिग बॉस 17 च्या घरात असताना ईशा आणि अभिषेक यांच्यामध्ये जोरदार भांडणे ही बघायला मिळाली. हेच नाही तर थेट एकमेकांच्या अंगावरही अनेकदा हे दोघे गेले.

ईशा मालवीय बेघर होताच अभिषेक रडताना दिसला. आयशा खान आणि त्यानंतर आता ईशा मालवीय ही बेघर झाली आहे. आता फिनाले वीक सुरू आहे.