
‘कुल्फिकुमार बाजेवाला’ (Kulfikumar Bajewala) फेम प्रसिद्ध अभिनेता मोहित मलिक (Mohit Malik) आणि त्याची पत्नी आदिती शिरवईकर (Aditi Malik) आता पालक बनले आहेत.

गेले अनेक दिवस आदिती शिरवईकरच्या प्रेग्नेंसी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालत होते.

मोहित आणि त्याची पत्नी आदिती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, हे दोघेही आता एका मुलाचे पालक बनले आहेत. त्यांच्या या पोस्टमध्ये, त्याने लिहिले की, ‘धन्यवाद माझ्या प्रिय चिमुकल्या विश्वाचे. रात्रभर रडण्याबद्दल आणि त्यासह या जगात आलेल्या या आश्चर्याबद्दल धन्यवाद. कारण आम्हाला खूप भाग्यवान वाटत आहे की, आम्ही आमच्या मुलाचे या जगात स्वागत केले.’

मोहित आणि आदितीचे लग्न डिसेंबर 2010 मध्ये झाले होते. अलीकडेच, त्यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या 10 वर्षानंतर ही जोडी पालक बनली आहे.

काही महिन्यांपूर्वी मोहितने पत्नीच्या डोहाळेजेवणाची सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केली होती. हा डोहाळेजेवणाचा विधी पाश्चिमात्य नसून पारंपारिक शैलीत आयोजित केला होता.

या जोडप्याची पहिली भेट ‘मिली’ (Mili) या मालिकेच्या सेटवर झाली होती. मोहित अखेर स्टार प्लस सीरियल ‘लॉकडाऊन की लव्ह स्टोरी’ मध्ये दिसला होता.

मोहित मलिक गेली 15 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत, पण गुल खान निर्मित मालिका ‘कुल्फिकुमार बाजेवाला’ मध्ये त्याने साकारलेल्या भूमिकेबद्दल त्याचे खूप कौतुक झाले होते.