
नेहमीच हटके आणि खास गोष्टींसाठी चर्चेत असणारे दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोमध्ये सुर्यास्तावेळी प्रवीण तरडे आपल्या मुलासोबत सिंहगडावर बसलेले आहेत.

या फोटोमध्ये सर्वांच लक्ष वेधून घेतय ते म्हणजे त्यांनी या फोटोला दिलेलं कॅप्शन.

‘मुलांना ट्रिपला “ थंड हवेच्या “ ठिकाणी जरूर न्या .. पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका .. तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा ..???आजची संध्याकाळ सिंहगडावर ???’ असं कॅप्सन देत त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हा फोटो काही साधा नाहीये. सिंहगडावर बसून प्रवीण तरडे मुलाला ‘श्रीमान योगी’ ही कादंबरी ऐकवत आहेत.