
‘तुझ्यात जीव रंगला’ या छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारत घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री धनश्री काडगावकरने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.

पतीच्या वाढदिवसा दिवशी तिने ही खास बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे.

या गोड बातमीनंतर धनश्रीने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यात ती ‘बेबी बंप’सह छान पोझ देताना दिसली होती.

‘तुझ्यात जीव रंगला’ नंतर धनश्री ‘डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमात दिसली होती. त्यानंतर तिने सगळ्या कामांतून ब्रेक घेतला होता.

लॉकडाऊन दरम्यान धनश्री आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होती.

धनश्रीने एक खास व्हिडिओ शेअर करत, आपण आई होणार असल्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. विशेष म्हणजे या खास बातमीसाठी तिने दिवसही खास निवडला.

तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.