
पाकिस्तानी अभिनेता मोहसिन अब्बास हैदर याच्या एक्स पत्नीने हैराण करणारे खुलासे केले. दोघांचा घटस्फोट झाला असून यांना एक मुलगा देखील आहे.

एका मुलाखतीमध्ये फातिमाने सांगितले की, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पतीने तिला मारहाण केली. मोहसिन मला त्याच्या घरच्यांसमोरच मारहाण करत असतं.

हेच नाही तर फातिमा हिने धक्कादायक खुलासा करत म्हटले की, मोहसिन हा दुसऱ्या महिलांना काॅलवर ठेवून मला कायमच मारहाण करत असत.

फातिमा म्हणाली की, मोहसिनला त्याच्या मुलाचेही काहीच देणे घेणे नाहीये. त्याला हे देखील माहिती नाही की, त्याचा मुलगा कुठे आहे.

आपले आई वडिल अशा मुलांसाठी आपल्याला जन्माला घालतात का? यांच्यासाठी आपण इतके शिकतो का? फातिमाचे खुलासे ऐकून लोक हैराण झाले आहेत.